LIVE UPDATES

आयुष मंत्रालयाच्या योग शिक्षक परिक्षेत शर्मिला केळुसकर यांचे यश

शर्मिला मिलिंद केळुसकर विद्यामंदिर हायस्कूलच्या शिक्षिका
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 12, 2022 14:43 PM
views 672  views

कणकवली : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या योग शिक्षक आणि परीक्षक स्तर - ३ या नामांकित स्पर्धा परिक्षेत विद्यामंदिर हायस्कूलच्या शिक्षिका सौ. शर्मिला मिलिंद केळुसकर यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून कौतूक होत आहे.

सरकारकडून दरवर्षी योग शिक्षक आणि परीक्षक स्तर - ३ ही राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा देशातील योग विद्यार्थी देतात. काटेकोरपणाने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेचा निकालही कठीण असतो. या परिक्षेत सौ. शर्मिला केळुसकर यांनी यश संपादन केले आहे. २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या पतंजली योगपीठ (ट्रस्ट) तर्फे घेण्यात आलेल्या योग सहाय्यक या राज्यस्तरीय परीक्षे राज्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकाविला होता