LIVE UPDATES

Nitesh Rane Criticizes Rahul Gandhi : राहुल गांधींना देशातील जनतेने वर्षानुवर्षे नापास केले

पालकमंत्री नीतेश राणेंची टीका
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 20, 2026 04:32 PM
views 100  views
Maharashtra Minister Nitesh Rane criticizes Rahul Gandhi while speaking to reporters during his Kankavli visit.

कणकवली : कणकवली रेल्वेस्‍थानक येथे निवारा शेड लोकार्पण व लिफ्‍ट बांधकाम शुभारंभासाठी आलेले पालकमंत्री नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्‍यावर जोरदार टिका केली. राहुल गांधी यांना देशातील नागरिकांनी वर्षानुवर्षे नापासच केले आहे, असे राणे म्‍हणाले.

राणे पुढे म्‍हणाले, भारताबाहेर राहून भारताची बदनामी करणे, पाकिस्‍तानची स्‍क्रीप्‍ट वाचून दाखवणे हे प्रकार राहुल गांधी करतात. पाकिस्‍तानच्‍या पार्लमेंटमध्‍ये भारताच्‍या विरोधात बोलले जाते, तीच भाषा राहुल गांधी वापरतात. राहुल गांधी यांनी त्‍यांचे देशप्रेम काय आहे हे नेहमी कृतीतून दाखवून दिले आहे. सुदैवाने आज देशामध्ये काँग्रेसचा पंतप्रधान नाही.‌ नाहीतर पाकिस्तानच्या अतिरेक्यांची गळाभेट घेणारा पंतप्रधान आपणाला दिसला असता, अशीही टिका राणे यांनी केली.