LIVE UPDATES

Kankavli News : पत्रकार विजय गांवकर यांना मातृशोक

सुनीता गावकर यांचे निधन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 22, 2026 06:06 PM
views 16  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कणकवली :सुनिता साबाजी गांवकर (८६ , नाडकर्णी नगर, कलमठ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.  सुनिता यांचा जन्म अखंड हिंदुस्थानातल्या (पाकिस्तान मधल्या) कराची येथे झाला होता. फाळणीच्या झळा त्यांनी बालवयातच सोसल्या होत्या. भारत पाकिस्तान फाळणी नंतर भारतात आल्यावर सुरुवातीला काही काळ बोरिवलीच्या जंगल सदृश्य भागात वास्तव्य केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना उल्हासनगर येथील बॅराक मध्ये हलविण्यात आले होते, आणि त्यानंतर त्यांचे बालपण आणि तरुणपण या ठिकाणीच व्यतीत झाले होते. 

लग्नानंतर त्या मुंबई शहरात वास्तव्यास आल्या. परंतु त्यांना त्यांच्या मूळ गाव दिगवळेची ओढ जास्त असल्यामुळे त्या पतीबरोबर वरचेवर दिगवळे येथे येत. अखेर त्यांनी नाडकर्णी नगर कलमठ येथे स्वतःचे घर बांधण्याचा आग्रह धरून या ठिकाणी घर बांधले आणि या ठिकाणी राहावयास आल्या.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे , नातसूना,  पतवंडे आहेत. वरिष्ठ पत्रकार विजय गांवकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर कणकवली येथील स्मशानभूमीत  सोमवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Stray Dogs Solution Maharashtra : भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करा
November 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal News : तळकोकणातील जत्रोत्सवांना मोठ्या उत्साहात प्रारंभ
November 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Dodamarg News : दोडामार्गात जिजाऊ संघटनेतर्फे मोफत वह्यांचे वाटप
November 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Dodamarg News : शासकीय धान्य गोदामातील निकृष्ट गव्हाची चौकशी करा
November 22, 2026
संबंधित बातम्या