
खानापूर : महाराष्ट्रातील एका गावात एकाही घरासमोर तुलसी वृंदावन नाही आहे. तरीही संपूर्ण गाव तुळशीच्या भक्तीत न्हाऊन निघतं. खानापूर तालुक्यातील हत्तरवाड इथे प्रत्येक कुटुंब गावाच्या मध्यभागी असलेल्या एकाच तुळशीला आपली मानून तिची पूजा करतात.
अनेक दशकांपासून जपलेली ही 'एक गाव एक तुलसी विवाह' परंपरा सामाजिक सलोखा, बंधुत्व आणि एकतेचं जिवंत उदाहरण आहे. नवसाला पावणारी तुळस अशी हिची ख्याती. त्यामुळेच नंदगड, हलसी, हलगा, मेरडासह गोवा, महाराष्ट्र, पुणे आणि मुंबईतून हजारो भाविक, माहेरवाशिणी आणि उद्योजक आवर्जून इथे येतात.
गाव प्रमुख, ग्रामस्थ आणि पंच कमिटीच्या साथीने हा सोहळा मोठ्या थाटात रंगतो. लहानशा हत्तरवाड गावातील ९० हून अधिक सुपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. गावाची राखणदारी करणारी ही तुळसच सीमेवर आमचं रक्षण करते अशी या जवानांची अतूट श्रद्धा आहे. म्हणूनच या भव्य सोहळ्याचा खर्च उचलण्यात हे जवानच पुढाकार घेतात. विद्युत रोषणाई, दीपोत्सव आणि आवळा, चिंच, चिरमुऱ्यांचा पूर्वापर चालत आलेला प्रसाद. एकता आणि श्रद्धेचा हा सोहळा खरोखरच प्रेरणादायी आहे.
संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








