LIVE UPDATES

लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत प्रभास अव्वल; शाहरुख खान दुसऱ्या, सलमान खान कितव्या क्रमांकावर?

Ormax Top 10 Popular Actors October 2026 : 'ओरमॅक्स टॉप १०'च्या रिपोर्टनुसार, प्रभास गेल्या अनेक महिन्यांपासून आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 03:39 PM
views 108  views
Ormax Top 10 most popular Indian actors list October 2026 featuring Prabhas and Shah Rukh Khan

नवी दिल्ली : 'ओरमॅक्स मीडिया'ने ऑक्टोबर २०२६ महिन्यासाठी सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांची 'टॉप १०' यादी 'ओरमॅक्स टॉप १०' यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कोणत्या अभिनेत्याने पहिले स्थान पटकावले आहे आणि कोण या यादीमध्ये शेवटच्या स्थानावर आहे ते जाणून घेऊया.

'ओरमॅक्स टॉप १०'च्या रिपोर्टनुसार, प्रभास गेल्या अनेक महिन्यांपासून आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. 'बाहुबली' फेम दक्षिण भारतीय सुपरस्टार प्रभासने पहिले स्थान कायम राखले आहे. 

'ओरमॅक्स'च्या यादीत शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण भारतीय सुपरस्टार आणि राजकारणी थलपथी विजय तिसऱ्या स्थानावर आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण भारतीय सुपरस्टार महेश बाबू पाचव्या स्थानावर आहेत, तर सुपरस्टार यश सहाव्या क्रमांकावर आहेत.

अलीकडच्या काळात अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे चर्चेत असलेले दक्षिण भारतीय सुपरस्टार सूर्या या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील 'दबंग' स्टार सलमान खान आठव्या स्थानावर आहेत तर अक्षय कुमार नवव्या क्रमांकावर आहेत.


ताजी बातमी

View all

Lutru Mahadev Temple in Solan Himachal Pradesh where devotees offer lit cigarettes to Lord Shiva
Lutru Mahadev Temple : देवाला चक्क दारू आणि सिगारेटचा नैवेद्य?
November 21, 2026
Omkar Elephant : सावंतवाडी, वेंगुर्ल्यात धुमाकूळ घातल्यानंतर ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गात
November 21, 2026
Jijau Organization distributes free notebooks to school students in Dodamarg Sindhudurg under Nilesh Sambare's initiative.
कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार
November 21, 2026
Konkan Railway trains delayed at Sawantwadi railway station due to operational disruptions
Konkan Railway Delay : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
November 21, 2026
संबंधित बातम्या

View all

DARYAA short film directed by Kishor Arjun, selected for the 57th International Film Festival of India 2026.
DARYAA Short Film IFFI 2026 : कोकणचा ‘दर्या’ झळकणार इफ्फीच्या मंचावर
November 19, 2026
Veteran Dashavatar performer Mahadev Jiji Chodankar, remembered for his iconic villain and Jambuvant roles.
दशावताराचा खरा 'डॉन' काळाच्या पडद्याआड
November 18, 2026
Dashavatar artist Dr Gaurav Shirke receiving the Konkan Kala Ratna Award at the Thane Malvani Festival.
Konkan Kalaratna Award : मुंबईतील मालवणी महोत्‍सवात गौरव' शिर्के यांना ‘कोकण कलारत्‍न ’पुरस्‍कार प्रदान
November 18, 2026
दादा कोंडके यांच्या बहारदार गीतांचा रंगणार सुरेल कार्यक्रम
November 18, 2026