LIVE UPDATES

Dodamarg News : रात्री बसस्थानकात पार्क केलेली एसटी सकाळी महामार्गावर

दोडामार्गातील प्रकाराने खळबळ : कुंपण तोडले, ४५ लिटर डिझेलही गायब
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 07:29 PM
views 1650  views
MSRTC Kolhapur-Dodamarg bus found on highway after breaking bus stand compound wall

दोडामार्ग : दोडामार्ग बसस्थानकात शुक्रवारी रात्री पार्क केलेली कोल्हापूर-दोडामार्ग एसटी बस शनिवारी सकाळी चक्क महामार्गावर आढळल्याने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. बसस्थानकाचे चिरेबंदी कुंपण तोडून बस अर्धी आवारात, तर अर्धी महामार्गावर अशा अवस्थेत उभी होती. विशेष म्हणजे, बसचे नुकसान होण्यासोबतच आतील ४५ लिटर डिझेलही गायब झाल्याचे समोर आले. रात्रीच्या अंधारात बसचा हा प्रवास नेमका कसा झाला असावा? चिरेबंदी कुंपण कोणी तोडले असावे? व डिझेल चोर नेमके कोण? असे सवाल उपस्थित होत असून या अजब प्रकाराने दोडामार्ग तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर-दोडामार्ग वस्तीची एसटी बस शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दोडामार्ग बसस्थानकाच्या आतील आवारात उभी करण्यात आली होती. चालक श्रीकांत मारुती पाटील आणि वाहक सागर अरुण मुदगी यांनी बस नियोजित जागी पार्क केली. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर दोघेही बसस्थानकाच्या आवारात झोपण्यासाठी गेले. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असताना रात्रीच्या सुमारास मात्र नेमके काय घडले? याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

शनिवारी सकाळी उठल्यानंतर चालक आणि वाहकांना बस मूळ जागेवर दिसली नाही. त्यामुळे त्यांनी परिसरात शोध घेतला असता समोरचे दृश्य पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. बसस्थानकाच्या चिरेबंदी कुंपणाचा काही भाग तुटलेला होता आणि बस चक्क महामार्गाच्या दिशेने सरकलेली दिसली. बसचा अर्धा भाग बसस्थानकाच्या आवारात, तर उर्वरित अर्धा भाग मुख्य महामार्गावर होता. या प्रकारात बसचेही नुकसान झाले होते.

इतकेच नव्हे, तर बसची पाहणी केली असता आतील सुमारे ४५ लिटर डिझेल चोरीला गेल्याचेही समोर आले. त्यामुळे बस रात्रीच्या वेळी नेमकी कशामुळे सरकली? बसस्थानकाचे कुंपण कसे तुटले? बस महामार्गापर्यंत कशी पोहोचली? आणि डिझेल चोरीचा प्रकार नेमका कधी घडला? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

विशेष म्हणजे, ही बस दररोज सकाळी ६.३० वाजता दोडामार्ग बसस्थानकातून कोल्हापूरच्या दिशेने रवाना होते. मात्र, शनिवारी सकाळी बसच्या या अनपेक्षित अवस्थेमुळे तिची नियोजित फेरीही होऊ शकली नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज असलेली बस सकाळी प्रवासाला निघण्याऐवजी बस स्थानकात अडकून पडल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकाराबाबत अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे बसच्या या रात्रीच्या प्रवासामागचे गूढ कायम आहे.

बस स्वतःहून सरकली की अन्य काही कारणामुळे हा प्रकार घडला? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, बसस्थानकात मुक्कामाला असलेली एसटी सकाळी थेट महामार्गावर आढळणे आणि त्यातून ४५ लिटर डिझेल गायब होणे, या अनोख्या घटनेने दोडामार्ग तालुक्यात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.


ताजी बातमी

View all

Lutru Mahadev Temple in Solan Himachal Pradesh where devotees offer lit cigarettes to Lord Shiva
Lutru Mahadev Temple : देवाला चक्क दारू आणि सिगारेटचा नैवेद्य?
November 21, 2026
Omkar Elephant : सावंतवाडी, वेंगुर्ल्यात धुमाकूळ घातल्यानंतर ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गात
November 21, 2026
Jijau Organization distributes free notebooks to school students in Dodamarg Sindhudurg under Nilesh Sambare's initiative.
कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार
November 21, 2026
Konkan Railway trains delayed at Sawantwadi railway station due to operational disruptions
Konkan Railway Delay : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
November 21, 2026
संबंधित बातम्या

View all

Omkar Elephant : सावंतवाडी, वेंगुर्ल्यात धुमाकूळ घातल्यानंतर ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्गात
November 21, 2026
Jijau Organization distributes free notebooks to school students in Dodamarg Sindhudurg under Nilesh Sambare's initiative.
कोकणातून अधिकारी घडवणे हेच ध्येय असून शेवटच्या श्वासापर्यंत कोकणासाठी काम करणार
November 21, 2026
Konkan Railway trains delayed at Sawantwadi railway station due to operational disruptions
Konkan Railway Delay : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
November 21, 2026
यंदा कणकवली पर्यटन महोत्सव मोठ्या उत्साहात होणार
November 21, 2026