LIVE UPDATES

Kudal News : तळकोकणातील जत्रोत्सवांना मोठ्या उत्साहात प्रारंभ

आवळेगावच्या श्री देव नारायण मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 22, 2026 04:49 PM
views 49  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कुडाळ : तळकोकणातील ग्रामदेवतांच्या वार्षिक जत्रोत्सवाला मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात प्रारंभ झाला आहे. तळकोकणातील पहिली जत्रा अशी ओळख आणि संस्थानकालीन परंपरा लाभलेल्या कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील श्री देव नारायण मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव पार पडला.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर अशा त्रिदेवांचे एकत्रित वास्तव्य असलेल्या या जागृत देवस्थानात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुबक फुलांची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता.

या जत्रोत्सवाचे विशेष आकर्षण असलेल्या कोकणी मेव्याचे, विशेषतः गरमागरम भजी आणि खाजाचे अनेक स्टॉल्स जत्रेत थाटण्यात आले होते. भाविकांनी देवदर्शनासोबतच या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत जत्रेचा आनंद लुटला. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनीही मंदिरात उपस्थित राहून श्री देव नारायणाचे दर्शन घेतले.