LIVE UPDATES

China Dog Carrying Festival : येथे कुत्र्याला राजेशाही मान...

आपल्‍याला हे माहिती आहे का ?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 05:44 PM
views 80  views
Dog Dressed in Traditional Royal Costume During China's Dog Carrying Festival in Miao Village

चीन : जगातल्या अशा काही अजब परंपरा आहेत ज्या ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो. पण, चीनच्या एका गावात कुत्र्याला चक्क राजाचा मान मिळतो आणि त्याची पालखीतून मिरवणूक काढली जाते. चीनमधील नैऋत्येकडील गुइझोऊ प्रांतातील 'जियाओबांग' गावात राहणाऱ्या मियाओ समुदायामध्ये कुत्र्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. 

संकटाच्या वेळी गावाचं रक्षण करणाऱ्या या प्राण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे दरवर्षी साजरा केला जातो. 'डॉग कॅरिंग फेस्टिव्हल' किंवा स्थानिक भाषेत 'ताई गोउ जी' या उत्सवासाठी एका खास कुत्र्याची निवड केली जाते. त्याला मियाओ पद्धतीचे रंगीबेरंगी कपडे, वाघाच्या डिझाईनची टोपी आणि गळ्यात चांदीचे दागिने घातले जातात. बांबूच्या पालखीत बसवून गावकऱ्यांकडून त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. 

एवढंच नाही तर, गावात चांगला पाऊस पडावा आणि पिकांची समृद्धी राहावी म्हणून लोक एकमेकांवर चिखलही उडवतात! कुत्रा हा केवळ पाळीव प्राणी नसून संकटाच्या वेळी मदत करणारा आणि गावाचं रक्षण करणारा साथीदार असल्याची त्यांची भावना आहे. प्राण्यांवरील प्रेमाची आणि विश्वासाची ही अनोखी परंपरा तुम्हाला कशी वाटली ? कमेंट करून नक्की सांगा 


ताजी बातमी

View all

मोर्वे हिंदळे येथील दिनेश मोर्वेकर यांचे आकस्मिक निधन
October 31, 2026
Eco-friendly Diwali Akash Kandil made from rice straw by Sunil Mulik from Dhakore, Sawantwadi.
Eco-Friendly Akash Kandil : ट्रेंडिंग 'ग्रीन दिवाळी'! धाकोरेच्या सुनील मुळीक यांचा भाताच्या गवतापासून इको-फ्रेंडली आकाश कंदील
October 31, 2026
कुंभवडे शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे ४ नोव्हेंबरपर्यंत भरणार
October 31, 2026
सावंतवाडीत काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार पटेल जयंती साजरी
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

Trans Bharat Aviation helicopter reported missing while flying from Badrinath to Dehradun with six people on board.
बद्रीनाथहून डेहराडूनला जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता! वैमानिकासह ६ जणांचा समावेश; एसडीआरएफ, लष्कराकडून शोधमोहीम सुरू
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Goa News : १४ नोव्हेंबरला गोव्यात रंगणार नांदी संमेलन
October 30, 2026
Fire destroys over 150 shops at Vasco Sunday Market in Goa ahead of Diwali
गोव्यात आगीचे तांडव! वास्कोतील संडे मार्केटमधील १५० हून अधिक दुकाने जळून खाक
October 29, 2026
Goa Chief Minister Dr. Pramod Sawant providing first aid to an accident victim in Naveli-Sakali, Goa.
Dr. Pramod Sawant : अपघातग्रस्त युवकाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
October 28, 2026