
उत्तराखंड : 'चार धाम' तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या बद्रीनाथवरून परतत असलेले एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह एकूण सहा व्यक्ती होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ दरम्यान हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. बचाव आणि मदत कार्यासाठी पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्करी जवान आणि इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर दुपारी सव्वा एकच्या सुमारास बद्रीनाथवरून डेहराडूनच्या दिशेने निघाले होते. हे हेलिकॉप्टर 'ट्रान्स भारत एव्हिएशन' या कंपनीचे असल्याचे समजते. हेलिकॉप्टर एखाद्या डोंगराच्या कड्याला धडकल्यामुळे कोसळले असावे. बेपत्ता झालेल्या या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकाव्यतिरिक्त पाच प्रवासी होते. यामध्ये वैमानिक हिमांशू यांच्यासह प्रताप, अरुण साळुंखे, शंकरगौडा व्ही.जी., सुधीर के. आणि एच.एस. नागराज यांचा समावेश होता.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणा (UCADA) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे शेवटचे लोकेशन जोशीमठजवळील 'चई' गावाजवळ नोंदवण्यात आले होते. अद्याप हेलिकॉप्टरचे अवशेष सापडलेले नाहीत. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक बचाव पथक त्या भागाकडे रवाना झाले असून एसडीआरएफ आणि पोलीस पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.
#WATCH | Uttarakhand: A team from the district administration is currently searching for the missing helicopter travelling from Badrinath to Dehradun. Smoke was seen rising near Chaien village in Joshimath, following the disappearance of the helicopter. There are six people on board the helicopter, including five passengers and one pilot: Chamoli district administration
— ANI (@ANI) October 30, 2026
उपलब्ध माहितीनुसार, 'ट्रान्स भारत एव्हिएशन'चे हे हेलिकॉप्टर शुक्रवारी दुपारी १:१२ वाजता बद्रीनाथ धाम हेलिपॅडवरून उडाले होते. डेहराडूनमधील सहस्रधाराच्या दिशेने प्रवास करत असताना उड्डाण सुरू झाल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनंतर हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि रेडिओ कम्युनिकेशनशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्याप हेलिकॉप्टरचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








