
वेंगुर्ला : पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नेहमी आशावादी रहावे. कोणीही निराश होऊ नये. गरीब, श्रीमंती हा नशिबाचा भाग आहे. काम, मेहनत करत रहा. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणा. चांगले गुण आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी वेंगुर्ला येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले.
वेंगुर्ला येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात खासदार नारायण राणे बोलत होते. सर्वप्रथम भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, डॉ. मिलिंद कुलकर्णी, पंचायत समिती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, संकेत धुरी, प्रियांका घाटवळ, नगरसेवक दाजी परब, अॅड.सुषमा खानोलकर, शितल आंगचेकर, आकांक्षा परब, रिया केरकर, काजल कुबल, गौरी माईणकर, सदानंद गिरप, प्रितम सावंत, सचिन शेटये, सुधीर पालयेकर, तुळस सरपंच रश्मी परब, पाल सरपंच कावेरी गावडे, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, रेडी सरपंच रामसिंग राणे, मठ सरपंच रूपाली नाईक, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष समिधा नाईक, जनार्दन पडवळ, कमलेश गावडे, भूषण आंगचेकर, भूषण सारंग, हितेश धुरी, तुषार साळगांवकर, मारूती दोडशानट्टी यांच्यासहीत भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार राणे म्हणाले की, "वेंगुर्ल्याची माणसं आणि इथला निसर्ग मला फार आवडतो. सिंधुदुर्गात आल्यावर एकतरी फेरी वेंगुर्ल्यात मारावी अशी नेहमी इच्छा असते. मी 1990 साली सिंधुदुर्गात आलो. मला बाळासाहेबांनी सिंधुदुर्गात जाण्याचे आदेश दिले. मी बाळासाहेबांच्या विचारातून बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. आपण ज्यांच्याशी बोलतोय त्यांचे चेहरे अनुभवले पाहिजेत, अशाप्रकारच्या त्यांच्या विचारातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या".
"बाळासाहेबांमुळे राजकीय जीवनात मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचून आज राजकीय वाटचालीत दहा महत्त्वाची पदे मिळविली याचे समाधान आहे. लोकांच्या हितासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या माझ्या पदांचा नेहमीच वापर केला याचा मला आनंद आहे. आज सर्वांना भेटावं, बोलावं हा आजच्या भेटी मागचा एकच उद्देश होता" असे सांगत खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय वाटचालीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








