LIVE UPDATES

गोव्यात आगीचे तांडव! वास्कोतील संडे मार्केटमधील १५० हून अधिक दुकाने जळून खाक

मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन : दिवाळीपूर्वी व्यापाऱ्यांना मोठा फटका
Edited by: Rajat Sawant
Published on: October 29, 2026 01:45 PM
views 126  views
Fire destroys over 150 shops at Vasco Sunday Market in Goa ahead of Diwali

Vasco Fire News : गोव्यातील वास्को शहरात दोन भीषण आगी लागल्याची घटना घडली आहे. यातील एका बाजारपेठेत लागलेल्या भीषण आगीत १५० हून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. या एकापाठोपाठ घडलेल्या आगीच्या घटनांमुळे शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टिळक मैदानाजवळ कार ऍक्सेसरीजच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून दुकानाच्या बाजूला असलेल्या दोन दुचाकीही जळून खाक झाल्या. आगीत मालाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आल्यानंतर दलाचे कर्मचारी परतत असतानाच रात्री 11 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास रविवार बाजारपेठेत (संण्डे मार्केट) मध्ये दुसरी आग लागली. या आगीत १५० हून अधिक दुकाने नष्ट झाल्याची माहिती आहे.

ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर ग्राहकांसाठी भरून ठेवलेला माल बाजारपेठेत लागलेल्या आगीत नष्ट झाल्याने अनेक व्यापारी हतबल होऊन अश्रू ढाळताना दिसले. या आगीत कपडे, पादत्राणे, भांडी आणि विविध वस्तू विकणाऱ्या लहान व्यावसायिकांचे यामुळे अतोनात नुकसान झाले.

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यासाठी वास्को, मडगाव, पणजी, वेर्णा, फोंडा आणि जुने गोवा येथून अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने रवाना करण्यात आल्या. पोलिसांनीही परिस्थिती हाताळली. पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी 'पीटीआय'ला सांगितले की, आग विझवण्यासाठी भारतीय नौदल, तटरक्षक दल, गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि मोरमुगाव पोर्ट अथॉरिटीसह विविध संस्थांच्या अग्निशमन गाड्या तातडीने घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या.

मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दिली भेट
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, मंत्री मावीन गुदिन्हो, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आणि मामलेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, "या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची शासन पातळीवर सखोल पाहणी केली जाईल आणि प्रभावित सर्व दुकानदारांना सरकारतर्फे सर्वतोपरी आर्थिक मदत केली जाईल. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, याबद्दल मी देवाचे आभार मानतो." तसेच, काही व्यापाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश वास्को पोलिसांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Devgad News : वाघिवरे-वेळगिवेत बीएसएनएल टॉवरचा मार्ग मोकळा
October 29, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Blue Economy : 'ब्लू इकॉनॉमी'चा सहकार पॅटर्न
October 29, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच लक्ष वेधूनही चौकशी का नाही ?
October 29, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Devgad News : 5 अवैध पर्ससीन मासेमारी नौकांवर कारवाई
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

Goa Chief Minister Dr. Pramod Sawant providing first aid to an accident victim in Naveli-Sakali, Goa.
Dr. Pramod Sawant : अपघातग्रस्त युवकाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
October 28, 2026
Emergency response following a reported high-speed train collision in Spain
स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची धडक, १० जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी
October 28, 2026
 Cyclone Arnab impacts Andhra Pradesh with heavy rain and strong winds
Cyclone Arnab : 'अर्णब' चक्रीवादळाचा तडाखा! २४ जिल्हे बाधित, १.३५ लाख लोकांचे स्थलांतर; १०० हून अधिक रेल्वे रद्द
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news# supreme court of india
Supreme court : एसआयआरला मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
October 27, 2026