LIVE UPDATES

Sawantwadi Scam : शहरात एमएनजीएल गॅस कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांना गंडा

पोलिसांचे सतर्क राहण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 12:54 PM
views 134  views
Sawantwadi Police issue a warning against fake MGL gas connection calls and OTP-based banking fraud targeting residents.

सावंतवाडी : शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एमएनजीएल घरगुती गॅस कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. मोबाईलवर येणारे बनावट संदेश आणि फोन कॉलद्वारे ओटीपी मागवून नागरिकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले जात आहेत. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात मागील काही दिवसांपासून नागरिकांना घरगुती गॅस कनेक्शनबाबत विविध मोबाईल संदेश आणि फोन कॉल येत आहेत. या माध्यमातून नागरिकांकडे गोपनीय ओटीपीची मागणी केली जात असून या भूलथापांना बळी पडल्यामुळे  सावंतवाडी शहरातील दोन ते तीन नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली आले आहे. या गंभीर प्रकारची दखल घेत सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनानुसार, सावंतवाडी शहरात एमएनजीएल घरगुती गॅस कनेक्शनबाबत सध्या कोणतीही अधिकृत सेवा कार्यान्वित करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एमजीएल गॅस कनेक्शनबाबत येणाऱ्या कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड तपशील किंवा इतर गोपनीय माहिती शेअर करू नका.

गॅस कनेक्शन सुरू किंवा बंद करण्याच्या नावाखाली कोणी पैसे किंवा ओटीपी मागितल्यास अजिबात प्रतिसाद देऊ नका तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करणे किंवा अनोळखी ॲप्स मोबाईलमध्ये डाउनलोड करणे टाळा अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा किंवा आमिषाबाबत स्थानिक कार्यालयात जाऊन खात्री करा असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना किंवा धमक्यांना न जुमानता सतर्कता बाळगावी, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांनी केले आहे. दरम्यान, सायबर गुन्ह्याला बळी पडल्यास नागरिकांनी तात्काळ '१९३०' या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी, असे सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Maharashtra Government Approves 49 Educational Items Kit for Construction Workers' Children
Maharashtra Education Scheme : बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार
October 31, 2026
BJP councillors meet Sawantwadi police officials over fake MNGL gas connection calls and online OTP fraud targeting residents.
MNGL Gas Fraud in Sawantwadi : सावंतवाडीत एमएनजीएलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करा
October 31, 2026
वेंगुर्ल्यात १ नोव्हेंबर रोजी महारक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन
October 31, 2026
कुडाळमध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ५ किमी ‘रन फॉर युनिटी’
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi police take action against illegal Kalyan Matka gambling in Machhi Market and seize ₹11,000 cash and gambling materials.
Sawantwadi News : सावंतवाडी मच्छीमार्केट परिसरात मटका जुगाराचा पर्दाफाश
October 31, 2026
पोयरे ग्रामसभेतील महिला मारहाण प्रकरणी न्यायालयाचे एफआयआरचे आदेश
October 31, 2026
महिलेच्या पर्समधून तब्बल १२ तोळे दागिने लंपास
October 31, 2026
वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
October 30, 2026