
नवी दिल्ली : न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय एकदिवसीय संघात आणखी एक बदल करण्यात आला आहे. पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज आकिब नबीचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध कृष्णाने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी आकिब नबीचा संघात समावेश केल्याची घोषणा केली.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पुरुष निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आकिब नबीला संघात स्थान दिले आहे. आकिब उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. आकिबची सुरुवातीला मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी संघात निवड करण्यात आली होती मात्र तो आता मालिकेच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाचा भाग असेल.
🚨 News 🚨 Auqib Nabi added to #TeamIndia squad for first three ODIs vs New Zealand Details 🔽 | #NZvIND https://t.co/32rAdCiiDh
— BCCI (@BCCI) October 31, 2026
पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा अपडेटेड संघ
शुभमन गिल [कर्णधार], रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर [उपकर्णधार], केएल राहुल [यष्टीरक्षक], अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन [यष्टीरक्षक], मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी (केवळ पहिल्या सामन्यासाठी), आकिब नबी.
चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ
श्रेयस अय्यर [कर्णधार], रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन [यष्टीरक्षक, उपकर्णधार], अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र [यष्टीरक्षक], मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








