LIVE UPDATES

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची धडक, १० जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

Spain High-Speed Train Accident : स्पेनच्या रेल्वे पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'एडीआयएफ' या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी टोलेडो प्रांतात घडली. अपघातानंतर लगेचच रेल्वे सेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: October 28, 2026 04:02 PM
views 89  views
Emergency response following a reported high-speed train collision in Spain

नवी दिल्ली : स्पेनमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी सकाळी स्पेनच्या मध्यवर्ती भागात एक भीषण रेल्वे अपघात झाला. टोलेडो प्रांताजवळ दोन हाय-स्पीड रेल्वे गाड्यांची एकमेकांशी धडक झाली. स्पॅनिश प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात जखमींच्या नेमक्या संख्येबाबत अद्याप नेमकी आकडेवारी समजू शकलेली नाही. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक अहवालांतून समोर आले आहे.


स्पेनच्या रेल्वे पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'एडीआयएफ' (ADIF) या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी टोलेडो प्रांतात घडली. अपघातानंतर लगेचच माद्रिद, स्युदाद रियाल आणि आंदालुसिया दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही आणि रेल्वे मार्ग सुरक्षित असल्याचे घोषित केले जात नाही तोपर्यंत या मार्गांवर कोणतीही रेल्वे धावणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारी प्रसारक संस्था 'टीव्हीई' (TVE) च्या वृत्तानुसार, दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात असताना एका गाडीने दुसऱ्या गाडीच्या मागील भागाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की एका गाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.

हा अपघात स्पेनच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, या वर्षाच्या जानेवारी महिन्यातही स्पेनच्या दक्षिण भागात एक भीषण अपघात झाला होता. यामध्ये एक रेल्वे रुळावरून घसरून समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीवर आदळली होती. त्या घटनेत ४५ जणांचा मृत्यू झाला होता. २०१३ मध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतर ज्यात ८० जणांचा मृत्यू झाला होता ती स्पेनमधील ही सर्वात घातक घटना ठरली आहे.


ताजी बातमी

View all

संजू परब यांची शब्दपूर्ती! सांगेलीतील सातेरी मातेच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात
October 28, 2026
मळेवाडमध्ये गुरांना पाय-लागण सदृश आजाराची लक्षणे
October 28, 2026
सिंधुदुर्गात ‘मृत्युंजय दूत’ महिलांचा गौरव
October 28, 2026
Devendra Fadnavis launches online application facility for 24 Maharashtra Fisheries Department schemes on MahaDBT 2.0.
Maharashtra Fisheries Schemes : मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुविधा सुरू
October 28, 2026
संबंधित बातम्या

View all

 Cyclone Arnab impacts Andhra Pradesh with heavy rain and strong winds
Cyclone Arnab : 'अर्णब' चक्रीवादळाचा तडाखा! २४ जिल्हे बाधित, १.३५ लाख लोकांचे स्थलांतर; १०० हून अधिक रेल्वे रद्द
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news# supreme court of india
Supreme court : एसआयआरला मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
October 27, 2026
Nitin Nabin to Visit Goa for BJP Organisational Review
Nitin Nabin Goa Visit : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवस गोवा दौऱ्यावर
October 26, 2026
India updates motor vehicle rules covering E100 ethanol fuel for specially designed and certified flex-fuel vehicles.
१०० टक्के इथेनॉल इंधनाला केंद्राची मंजुरी, सामान्य पेट्रोल कारमध्ये वापर केल्यास काय होईल? वाचा सविस्तर
October 26, 2026