LIVE UPDATES

Nilesh Rane Navnath Ban : 'नवनाथ बन यांनी स्वतःवर ताबा ठेवावा' निलेश राणेंचा थेट इशारा

महायुतीतील वादावरून राणे आक्रमक; 'करिअरची सुरुवात झालीय, स्वतःहून संपवू नका' म्हणत बन यांना सल्ला
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 04:20 PM
views 99  views
Nilesh Rane addresses a press conference in Kudal and responds to Navnath Ban amid Mahayuti alliance tensions.

कुडाळ : महायुती सरकारमधील मतभेद आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "भाजपच्या कोणत्याही नेत्यावर आम्ही आरोप केलेले नाहीत. फालतू आरोप करणे चुकीचे असून बोलायला काहीतरी अर्थ असावा लागतो," अशा शब्दांत राणे यांनी टीकाकारांचा समाचार घेतला.

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, दीपलक्ष्मी पडते, रुपेश कानडे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, "आमच्या जागा आपल्यामुळे गेल्या, असे आरोप आम्ही कोणावर टाकले नाहीत. कुठे तरी नियोजनात कमतरता राहिली असेल, मात्र शिंदे साहेबांवर आरोप करणे अजिबात योग्य नाही. नवनाथ बन यांनी स्वतःवर ताबा ठेवावा. पदवीधर निवडणुकीत आम्ही सहकार्य केले नाही असे म्हणत असाल, तर साताऱ्यातील वाई येथे आम्हाला तरी कोणी सहकार्य करायला आले होते का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी बन यांना सल्ला दिला की, "आत्ता कुठे तुमच्या करिअरची सुरुवात झाली आहे, ती स्वतःहून संपवू नका. बन हे पत्रकारिता सोडून आत्ताच निवडणूक जिंकले आहेत."

महायुतीतील संबंधांवर भाष्य करताना राणे म्हणाले, "आपण युतीत आहोत. माझ्या मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत काय झाले हे जर मी बोलायला लागलो, तर अनेक पुस्तके खुली होतील. शिंदे साहेबांवर आरोप झाले, तेव्हा कोणी सहकार्य केले का? भारतीय जनता पक्ष हा आमचाही पक्ष आहे, आम्ही त्याला मानतो. पण जर सगळेच पुस्तक खोलायला लागले, तर त्याचा थेट फायदा विरोधकांना होईल. बन कशी निवडणूक जिंकले, हे मी नंतर कधीतरी नक्की सांगेन." अशी सूचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे..

'जबाबदारी एकमेकांवर ढकलणारा निलेश राणे नाही'

निवडणुकीच्या राजकारणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "४० आमदार सहज उठाव करत नाहीत. शिंदे साहेबांनी धाडसाने उठाव केल्यानंतरच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे विरोधकांना संधी देऊ नका. नवनाथ बन यांचा जीव एवढासा आणि ते बोलतात केवढे!" तसेच, "मी जबाबदारी एकमेकांवर ढकलणारा निलेश राणे नाही. आम्ही आमचे आत्मपरीक्षण नक्की करू, पण विनाकारण आरोप करणार नाही," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना निलेश राणे म्हणाले, "अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याला मी भीक घालत नाही. कोणताच विचार न करता बोलणे हीच त्यांची ख्याती आहे. ते माझ्या पूर्वीपासून राजकारणात आहेत, त्यांची जीभ विषारी आहे. मात्र, योग्य वेळ आली की त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल."


ताजी बातमी

View all

Nilesh Rane addresses the proposed Anjivade hydropower project and assures support to local residents in Kudal taluka.
Anjivade Hydropower Project : 'जनतेचा विरोध असेल तर माझाही ठाम विरोधच'
October 30, 2026
Vedika Vishal Parab inaugurates Lakshmi Aadhar Exhibition 2026 in Vengurla to promote women entrepreneurs and self-employment.
'महिलांना सहानुभूतीची नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाला संधीची गरज'
October 30, 2026
कुडाळ तालुक्यातील १,४४४ शेतकऱ्यांची 'आकारी पड' जमीन होणार मोकळी
October 30, 2026
Nitesh Rane performs the groundbreaking ceremony for a new garden project at historic Devgad Fort in Sindhudurg.
देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra government postpones cooperative society elections amid drought conditions.
Maharashtra Cooperative Elections Postponed : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
October 29, 2026
21 फेब्रुवारी रोजी इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा
October 29, 2026
Yogesh Indulkar
राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय चिटणीसपदी योगेश इंदुलकर
October 29, 2026
Meenakshi Shinde resigns as Shiv Sena women’s wing district chief amid the Pradeep Purnekar murder case controversy
मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा, ठाण्यात शिंदे-ठाकरे गट आमने सामने
October 29, 2026