LIVE UPDATES

सीमेवरील जवानांची दिवाळी गोड करणार सावंतवाडीतील 'अनाम प्रेम' परिवार

यंदाही सैनिकांसाठी पाठवले २५ हजार फराळाचे बॉक्स
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 02:04 PM
views 88  views
Anam Prem Family sends 25000 Diwali faral boxes to Indian soldiers deployed at the border.

सावंतवाडी : अनाम प्रेम या परिवाराकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील सैनिकांना फराळ पाठवण्यात येतो‌. जवळपास २५ हजार बॉक्स देशसेवेसाठी तत्पर असणाऱ्या सैनिकांना पाठवण्यात आले. देशभरातील अनाम प्रेम परिवारातील सदस्य या कार्यात सहभाग घेतात.

'प्रेम शिंपीत जा' या भावनेतून अनाम प्रेम परिवार काम करते. मकर संक्रांतीला रिक्षा चालक, प्रवाशांसाठी प्रवाशांशी गोड बोला, रिक्षा चालकांना आदर द्या उपक्रम राबविण्यात येतो. हिंडलगा येथे कुष्ठरोग रुग्णालयात अक्षयतृतीयेला सामाजिक उपक्रम यापुर्वी राबविण्यात यायचे तसेच आता नेत्रहीनांसाठी उपक्रम राबविण्यात येतात.

क्रांतिदिनी एसटी वाहक-चालकांचा सन्मान, पोस्टमनांचा सन्मान करत त्यांच्या सेवेला वंदन केलं जातं. तर चतुर्थीत रणहद्द सैनिक हा उपक्रम मुंबईत होतो. गांधी जयंतीला मुकबधीर युवक-युवतींसाठी कार्यशाळा, नवरात्रोत्सवात रुग्णालयातील स्त्रीला वंदन आदी विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शहीद जवान कुटुंबिय तसेच सेवानिवृत्त जवानांचा सन्मान केला जातो.

दिवाळीचा फराळ एकत्र केला जातो. तसेच सीमेवर तैनात सैनिकांसाठी दिवाळी निमित्त परिवारातील सदस्यांकडून बनलेला फराळ पाठवण्यात येतो‌. २५ हजार फराळ बॉक्स यावर्षीही सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात आलेत. 'अनाम प्रेम' परिवाराकडून सामाजिक बांधिलकीतून हे उपक्रम राबविण्यात येतात.


ताजी बातमी

View all

शिरगावच्या तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Dodamarg News : 'माझे गाव नशामुक्त गाव' अभियानांतर्गत जनजागृतीपर रॅली
October 30, 2026
Three drums filled with cash found buried underground at a house in Nawabganj, Uttar Pradesh.
घराखाली पुरलेले ३ ड्रम भरून नोटांचे घबाड! ६० कोटींच्या रकमेचे गूढ कायम, पुण्यातील कनेक्शनचीही चर्चा
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Sindhudurg Bank :ग्रामीण अर्थव्यवस्थेचा 'कणा' बळकट करणारे 'दळवी' पर्व
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

शिरगावच्या तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Dodamarg News : 'माझे गाव नशामुक्त गाव' अभियानांतर्गत जनजागृतीपर रॅली
October 30, 2026
सिंधुदुर्गात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती रॅली संपन्न
October 30, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Devgad News : शिरगाव तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी
October 30, 2026