LIVE UPDATES

देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन : जिल्हा नियोजन समितीतून १ कोटींचा निधी मंजूर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 04:05 PM
views 86  views
Nitesh Rane performs the groundbreaking ceremony for a new garden project at historic Devgad Fort in Sindhudurg.

देवगड : ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या पर्यटन विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारण्यात येणाऱ्या नयनरम्य उद्यानाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि समुद्राचे विहंगम दर्शन यांचा अनोखा संगम असलेले हे उद्यान देवगडच्या पर्यटन आकर्षणात भर घालणार आहे. या उद्यानामुळे पर्यटकांना एक नवे आकर्षक पर्यटनस्थळ उपलब्ध होणार असून, स्थानिक रोजगाराच्या संधी आणि पर्यटनपूरक व्यवसायांनाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.

या भूमिपूजन सोहळ्यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नंदकुमार घाटे, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, गटनेते शरद ठूकरूल, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, इंजिनिअर अभिजित कामत, उल्हास मणचेकर, प्रकाश राणे, डॉ. सुनील आठवले, देवगड पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष उगलमुगले, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता तथा सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल, सार्वजनिक बांधकाम विभाग देवगडचे उपविभागीय अभियंता शैलेश मोरजकर, कनिष्ठ अभियंता अविनाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

Nilesh Rane addresses the proposed Anjivade hydropower project and assures support to local residents in Kudal taluka.
Anjivade Hydropower Project : 'जनतेचा विरोध असेल तर माझाही ठाम विरोधच'
October 30, 2026
Vedika Vishal Parab inaugurates Lakshmi Aadhar Exhibition 2026 in Vengurla to promote women entrepreneurs and self-employment.
'महिलांना सहानुभूतीची नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाला संधीची गरज'
October 30, 2026
कुडाळ तालुक्यातील १,४४४ शेतकऱ्यांची 'आकारी पड' जमीन होणार मोकळी
October 30, 2026
Nilesh Rane addresses a press conference in Kudal and responds to Navnath Ban amid Mahayuti alliance tensions.
Nilesh Rane Navnath Ban : 'नवनाथ बन यांनी स्वतःवर ताबा ठेवावा' निलेश राणेंचा थेट इशारा
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

Nilesh Rane addresses the proposed Anjivade hydropower project and assures support to local residents in Kudal taluka.
Anjivade Hydropower Project : 'जनतेचा विरोध असेल तर माझाही ठाम विरोधच'
October 30, 2026
Vedika Vishal Parab inaugurates Lakshmi Aadhar Exhibition 2026 in Vengurla to promote women entrepreneurs and self-employment.
'महिलांना सहानुभूतीची नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाला संधीची गरज'
October 30, 2026
कुडाळ तालुक्यातील १,४४४ शेतकऱ्यांची 'आकारी पड' जमीन होणार मोकळी
October 30, 2026
शिरगावच्या तांत्रिक विद्यालयाच्या नामकरणावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी
October 30, 2026