LIVE UPDATES

21 फेब्रुवारी रोजी इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा

31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 07:30 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) रविवार, 21 फेब्रुवारी 2027 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र आणि नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदन पत्र 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत भरावेत असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

नियमित मुदतीनंतर उमेदवारांना विलंब शुल्कासह 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत अतिविलंब शुल्कासह 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2026 या कालावधीत, तर अति विशेष विलंब शुल्कासह 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. 31 डिसेंबर 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र स्वीकारले जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. 

परीक्षेचे वेळापत्रक, स्वरूप, पात्रता निकष, परीक्षेचे माध्यम आणि शुल्क भरण्याची पद्धत याविषयीची सविस्तर अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत भरावेत.


ताजी बातमी

View all

Sindhudurg District Cooperative Bank election process postponed due to drought conditions.
Sindhudurg Bank Election Postponed : दुष्काळामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर
October 29, 2026
Devgad News : देवगड-नांदगाव मार्गावर विनापरवाना चिरे वाहतुकीला दणका
October 29, 2026
Maharashtra government postpones cooperative society elections amid drought conditions.
Maharashtra Cooperative Elections Postponed : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
October 29, 2026
 Lasith Malinga, Paras Mhambrey and Carl Hopkinson part ways with Mumbai Indians ahead of IPL 2027.
आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, लसिथ मलिंगासह 'या' दोन प्रशिक्षकांना रामराम
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra government postpones cooperative society elections amid drought conditions.
Maharashtra Cooperative Elections Postponed : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
October 29, 2026
Yogesh Indulkar
राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय चिटणीसपदी योगेश इंदुलकर
October 29, 2026
Meenakshi Shinde resigns as Shiv Sena women’s wing district chief amid the Pradeep Purnekar murder case controversy
मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा, ठाण्यात शिंदे-ठाकरे गट आमने सामने
October 29, 2026
Nitesh Rane reviews CM Matsya Sampada Yojana implementation on MahaDBT 2.0
महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करा : मंत्री नितेश राणे
October 29, 2026