LIVE UPDATES

राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय चिटणीसपदी योगेश इंदुलकर

वैभववाडीतील तिरवडेच्या सुपुत्रावर पक्षाची महत्त्वाची जबाबदारी; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 29, 2026 07:13 PM
views 23  views
Yogesh Indulkar

वैभववाडी : तालुक्यातील तिरवडे तर्फ सौंदळ गावचे सुपुत्र आणि उद्योजक योगेश अनंत इंदुलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या मुंबई विभागीय चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान केले.

योगेश इंदुलकर हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. सध्या ते अजित पवार गटात कार्यरत असून, मुंबईतील विलेपार्ले येथे वास्तव्यास आहेत. राजकीय क्षेत्रासोबतच उद्योजक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नेर्ले-तिरवडे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. स्वतःचा व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील कार्याचा समतोल राखताना छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्रगतीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. शैक्षणिक संस्थेला आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यातही त्यांचे योगदान आहे.

स्वर्गीय अजित पवार यांच्याशी निकटचे संबंध असलेले इंदुलकर यांच्यावर पक्षाने मुंबई विभागीय चिटणीसपदाची जबाबदारी सोपविल्याने त्यांच्या राजकीय कार्याची दखल घेतल्याचे मानले जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तिरवडे-नेर्ले पंचक्रोशीसह वैभववाडी तालुक्यातील मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


ताजी बातमी

View all

 Lasith Malinga, Paras Mhambrey and Carl Hopkinson part ways with Mumbai Indians ahead of IPL 2027.
आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, लसिथ मलिंगासह 'या' दोन प्रशिक्षकांना रामराम
October 29, 2026
‘सम्यक’तर्फे कथा, कविता स्पर्धा
October 29, 2026
21 फेब्रुवारी रोजी इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा
October 29, 2026
मांगवलीत ३० ऑक्टोंबरला शेतकरी-पशुपालकांचा मेळावा
October 29, 2026
संबंधित बातम्या

View all

21 फेब्रुवारी रोजी इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा
October 29, 2026
Meenakshi Shinde resigns as Shiv Sena women’s wing district chief amid the Pradeep Purnekar murder case controversy
मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा, ठाण्यात शिंदे-ठाकरे गट आमने सामने
October 29, 2026
Nitesh Rane reviews CM Matsya Sampada Yojana implementation on MahaDBT 2.0
महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करा : मंत्री नितेश राणे
October 29, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : महायुतीवर आघाडी भारी
October 29, 2026