LIVE UPDATES

Devgad Hapus Mango Price : हंगामाआधीच देवगड हापूसचा ‘षटकार’

पहिल्या एका पेटीला तब्बल ३६ हजाराचा भाव : आंबा बागायतदार मिलेश बांदकर यांच्या आगळ्या प्रयोगाला घवघवीत यश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 06:44 PM
views 118  views
Devgad Alphonso Hapus mango box sold for ₹36,000 at Mumbai's Vashi Market before the regular mango season.

देवगड : देवगड हापूसचा दरारा पुन्हा एकदा मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये पाहायला मिळाला आहे. आंब्याचा नियमित हंगाम सुरू होण्यास अद्याप अवकाश असतानाच देवगडच्या हापूसने बाजारपेठेत जोरदार सलामी दिली आहे. देवगडमधील प्रगतशील बागायतदार मिलेश बांदकर यांनी पाठवलेल्या हापूस आंब्याच्या एका पेटीला वाशी मार्केटमध्ये तब्बल ३६ हजार रुपयांचा भाव मिळाला. हंगामापूर्वीच मिळालेल्या या विक्रमी दराने आंबा बागायतदारांचे लक्ष वेधले असून देवगड हापूसची चर्चा पुन्हा रंगली आहे.

विशेष म्हणजे, हा आंबा नेहमीच्या हंगामातील नसून जुलै महिन्यात आलेल्या मोहरातील आहे. या मोहरातून तयार झालेली फळे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने टिकवून ठेवण्यासाठी बांदकर यांनी विशेष काळजी घेतली. झाडावरील आंब्यांची सातत्याने निगा राखत ऑक्टोबर महिन्यापर्यंत ते आंबे तयार अवस्थेत ठेवण्याचा प्रयोग त्यांनी केला. त्यांच्या या नियोजनबद्ध प्रयत्नांना आता वाशी मार्केटमधील ३६ हजारांच्या भावाच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे.

नियमित हंगामापूर्वीच देवगड हापूसने एवढा मोठा दर मिळविल्याने आंबा उत्पादकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. योग्य नियोजन, आधुनिक दृष्टिकोन आणि प्रयोगशील वृत्तीची जोड मिळाल्यास हापूसच्या उत्पादनात वेगळे यश मिळवता येऊ शकते, हे मिलेश बांदकर यांच्या प्रयोगातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.


ताजी बातमी

View all

दिगवळेत दीड लाख किमतीच्या लोखंडी प्लेट्स चोरीस
October 30, 2026
सावंतवाडीत मोबाईलवरून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
October 30, 2026
International swimmer Purva Gawade attends the 39th Sindhudurg District Police Sports Competition closing ceremony as chief guest.
कालची सरावपटू आज प्रमुख पाहुणी; पूर्वाच्या आठवणींनी पोलीस मैदान गहिवरले
October 30, 2026
महाराष्ट्राच्या ग्रामविकासाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

Nilesh Rane addresses a press conference in Kudal and responds to Navnath Ban amid Mahayuti alliance tensions.
Nilesh Rane Navnath Ban : 'नवनाथ बन यांनी स्वतःवर ताबा ठेवावा' निलेश राणेंचा थेट इशारा
October 30, 2026
Maharashtra government postpones cooperative society elections amid drought conditions.
Maharashtra Cooperative Elections Postponed : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
October 29, 2026
21 फेब्रुवारी रोजी इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा
October 29, 2026
Yogesh Indulkar
राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय चिटणीसपदी योगेश इंदुलकर
October 29, 2026