LIVE UPDATES

महाराष्ट्राच्या ग्रामविकासाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार

प्रमोद कामत, दादा साईल यांना निमंत्रण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 07:52 PM
views 39  views

सिंधुदुर्ग : 'एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट' च्या अंतर्गत 'राष्ट्रीय सरपंच संसदे' च्यावतीने व 'राष्ट्रीय जि. प व पं. स सदस्य असोसिएशन' च्या सहकार्याने दिल्ली येथे 'महाराष्ट्र राज्य - ग्रामविकास परिषद, दिल्ली' चे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या विद्यमान महोदयांपुढे केंद्र शासनाशी निगडित असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकासासंबंधीत विविध समस्या, प्रश्न आणि ज्वलंत विषयांचे अभ्यासपूर्वक सादरीकरण करावे व त्यांच्या निराकारणासाठी केंद्र शासनाने ठोस उपाययोजना करावी यासाठी ही परिषद दिल्ली येथे आयोजित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे तसेच महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या 14 जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महाराष्ट्रातील निवडक सरपंच व 'राष्ट्रीय सरपंच संसदे'चे निवडक पदाधिकारी यांना दिल्ली येथील परिषदेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.

दिल्ली येथील 'महाराष्ट्र राज्य - ग्रामविकास परिषदे'त केंद्रीय मंत्र्यांना सादर करण्याचे लेखी निवेदन अभ्यासपूर्वकरीत्या तयार करण्यासाठी व कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्यासाठी प्रथमतः 'एमआयटी, पुणे' येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व 'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट'चे प्रणेते डॉ. राहुल कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होईल. राज्यातील विद्यमान जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, निवडक सरपंच व 'राष्ट्रीय सरपंच संसदे'चे निवडक पदाधिकारी यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात येत आहे.

ओरस येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत व उपाध्यक्ष दादा साईल यांना नियोजन बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सरपंच संसदे'चे कार्याध्यक्ष व प्रमुख समन्वयक योगेश पाटील, उपाध्यक्ष व सहसमन्वयक प्रकाशराव महाले, कोकण - नाशिक प्रांत अध्यक्ष ऍड. नकुल पार्सेकर व कोकण विभाग अध्यक्ष संतोष राणे आदी उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

Ancient temple ruins and historical stone sculptures discovered in Dhamapur village of Sangameshwar, Ratnagiri.
Dhamapur Ancient Temple and Palace : रानवेलींच्या कुशीत विसावलेला चालुक्यकालीन इतिहास
October 30, 2026
देवगडच्या वाडातरमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीचा छापा
October 30, 2026
Posco Act awareness campaign in Sindhudurg
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गात वर्षभर जनजागृती अभियान
October 30, 2026
कुडाळमध्ये महिला बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचे वाटप
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

Ancient temple ruins and historical stone sculptures discovered in Dhamapur village of Sangameshwar, Ratnagiri.
Dhamapur Ancient Temple and Palace : रानवेलींच्या कुशीत विसावलेला चालुक्यकालीन इतिहास
October 30, 2026
Posco Act awareness campaign in Sindhudurg
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गात वर्षभर जनजागृती अभियान
October 30, 2026
कुडाळमध्ये महिला बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचे वाटप
October 30, 2026
कुडाळ शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन
October 30, 2026