LIVE UPDATES

Unnayi Dam Tourism Project : उन्नयी बंधारा पर्यटन प्रकल्प लवकरच पर्यटकांसाठी खुला होणार

दीपक केसरकरांकडून पाहणी : दीड कोटींचे लँडस्केपिंग प्रस्तावित
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 06:52 PM
views 75  views
Deepak Kesarkar inspects Unnayi Dam tourism project at Tervan-Medhe in Dodamarg

दोडामार्ग : तालुक्यातील तेरवण-मेढे येथील उन्नयी बंधारा परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या पर्यटन प्रकल्पाला चालना देण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देत तेथील कॉटेजची पाहणी केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरात पर्यटनाला नवी दिशा मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे प्रकल्पातील अपूर्ण कामे, कॉटेजची दुरुस्ती, बोटिंग सुविधा आणि परिसराचे सुशोभीकरण करून हा प्रकल्प लवकरात लवकर पर्यटकांसाठी खुला करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जि. प. सदस्य दीपक गवस, साक्षी तळवडेकर, नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, युवासेना प्रमुख भगवान गवस, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पराशर सावंत, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तेरवण-मेढे येथील उन्नयी बंधारा पर्यटन प्रकल्पाची सुरुवात तत्कालीन चांदा ते बांदा योजनेतून करण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत यापूर्वी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत काही कॉटेजेसची कामे करण्यात आली होती. त्यानंतर नव्याने बांधण्यात आलेल्या कॉटेजची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आली असून, त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात जलपर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प विकसित होण्याची क्षमता आहे.

मोडकळीस आलेल्या कॉटेजची दुरुस्ती करून लवकरच लोकार्पण...

पाहणीदरम्यान काही कॉटेजची अवस्था दुरुस्ती करण्यासारखी असल्याचे निदर्शनास आले. याबाबत बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, "जे कॉटेज मोडकळीस आले आहेत किंवा ज्यांना दुरुस्तीची आवश्यकता आहे, त्यांची पूर्वीप्रमाणे योग्य स्थिती निर्माण केली जाईल. आवश्यक ती दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करून हा प्रकल्प लोकार्पणासाठी सज्ज करण्यात येईल. प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारीही योग्य पद्धतीने पार पाडली जाईल.

महिला बचत गटांना संधी देण्याचा विचार...

या पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचाही प्रयत्न राहणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. कॉटेजचे संचालन महिला बचत गटांकडे देता येईल का, त्यातून त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन कसे उपलब्ध होईल आणि त्यांचा आर्थिक फायदा अधिक कसा वाढवता येईल, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. पर्यटन प्रकल्प केवळ पर्यटकांच्या आकर्षणापुरता मर्यादित न राहता स्थानिकांच्या रोजगाराचे आणि आर्थिक स्वावलंबनाचे साधन बनावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लँडस्केपिंगसाठी दीड कोटींचा प्रस्ताव....

दरम्यान, उन्नयी बंधारा परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी लँडस्केपिंगचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संभाजी घंटे यांनी आमदार दीपक केसरकर यांना दिली. लँडस्केपिंगमुळे परिसर अधिक आकर्षक होऊन पर्यटकांना येथे दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

मंत्रालयात चर्चा करून प्रकल्पाला गती देणार...

हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत तसेच मुंबई येथे संबंधित मंत्रालय स्तरावर चर्चा करून आवश्यक त्या बाबी मार्गी लावण्यात येतील. प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करून पर्यटनाच्या दृष्टीने सर्व सुविधा कार्यान्वित करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार केसरकर यांनी यावेळी सांगितले. 


ताजी बातमी

View all

कुडाळ शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन
October 30, 2026
दिगवळेत दीड लाख किमतीच्या लोखंडी प्लेट्स चोरीस
October 30, 2026
सावंतवाडीत मोबाईलवरून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
October 30, 2026
International swimmer Purva Gawade attends the 39th Sindhudurg District Police Sports Competition closing ceremony as chief guest.
कालची सरावपटू आज प्रमुख पाहुणी; पूर्वाच्या आठवणींनी पोलीस मैदान गहिवरले
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

कुडाळ शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन
October 30, 2026
महाराष्ट्राच्या ग्रामविकासाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार
October 30, 2026
दोडामार्ग-तिलारी रस्त्याची आमदार दीपक केसरकरांकडून पाहणी
October 30, 2026
वेर्ले येथील श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचा होणार कायापालट
October 30, 2026