
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या पाठीमागे मोबाईलच्या सहाय्याने कल्याण नावाचा मटका जुगार खेळवणाऱ्या एका संशयितावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतवाडी पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. संशयित आरोपीस नोटीस बजावण्यात आली आहे.
आज दुपारच्या सुमारास सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाठीमागे हा प्रकार उघडकीस आला. संशयित आरोपी प्रवीण खटावकर (वय ३५, रा. कोलगाव चव्हाटावाडी, सावंतवाडी) हा स्वतःच्या मोबाईलवरून मटका जुगार घेत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव प्रकाश भुजबळ यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान घटनास्थळावरून ११ हजार २०० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे इतर साहित्य जप्त केले आहे. हा गुन्हा ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेचा असल्याने संशयित आरोपी प्रवीण खटावकर यास नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धुरी करत असून, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








