LIVE UPDATES

दिगवळेत दीड लाख किमतीच्या लोखंडी प्लेट्स चोरीस

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 08:11 PM
views 39  views

कणकवली : दिगवळे-किनवनेवाडी येथे एका शेडमध्ये गडनदीतील पात्रातील केटी बंधाऱ्यामध्ये पाणी अडविण्यासाठी ठेवलेल्या १ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या १५३ लोखंडी प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी चोरल्या. हा प्रकार शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी लघू पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल तुकाराम सामंत (वय ४३, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. कुडाळ ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

याबाबत अधिक वृत्त असे की, दिगवळे-किनवडेवाडी येथे पावसाळ्यापूर्वी केटी बंधाऱ्यावरील घातलेल्या लोखंडी प्लेट्स काढून त्या या परिसरातील एका शेडमध्ये ७ जून २०२६ रोजी ठेवण्यात आल्या होत्या. जून ते ऑक्टोंबर या कालावधीत अज्ञातांनी प्लेट्स चोरल्या आहेत. गुरुवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या विशाल सामंत हे लघू पाटबंधारे विभागाच्या ओरोस येथील कार्यालयात असताना त्यांना नवनाथ पवार यांनी फोनकरून उघडया शेडमध्ये ठेवलेल्या १५३ लोखंडी प्लेट्स दिसत नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सामंत हे घटनास्थळी गेले असता लोखंडी प्लेट्स शोध घेतला. परंतु त्या सापडून आल्या नाहीत. त्यामुळे अज्ञाताने प्लेट्स चोरून नेलेल्या आहेत, असे सामंत फिर्यादी म्हटले आहे.


ताजी बातमी

View all

Ancient temple ruins and historical stone sculptures discovered in Dhamapur village of Sangameshwar, Ratnagiri.
Dhamapur Ancient Temple and Palace : रानवेलींच्या कुशीत विसावलेला चालुक्यकालीन इतिहास
October 30, 2026
देवगडच्या वाडातरमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीचा छापा
October 30, 2026
Posco Act awareness campaign in Sindhudurg
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गात वर्षभर जनजागृती अभियान
October 30, 2026
कुडाळमध्ये महिला बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचे वाटप
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

देवगडच्या वाडातरमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीचा छापा
October 30, 2026
सावंतवाडीत मोबाईलवरून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
October 30, 2026
सावंतवाडी पोलिसांकडून संशयित महिला व पुरुषाचा शोध सुरू
October 30, 2026
Three drums filled with cash found buried underground at a house in Nawabganj, Uttar Pradesh.
घराखाली पुरलेले ३ ड्रम भरून नोटांचे घबाड! ६० कोटींच्या रकमेचे गूढ कायम, पुण्यातील कनेक्शनचीही चर्चा
October 30, 2026