LIVE UPDATES

परीक्षा-मुलाखतीशिवाय मिळणार नोकरीची संधी, आयओसीएलमध्ये ५८ अप्रेंटिस पदांसाठी भरती

IOCL Recruitment 2026 : 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड'ने 'ट्रेड अप्रेंटिस' आणि 'टेक्निशियन अप्रेंटिस' या पदांसाठी एकूण ५८ जागा भरण्याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 15:55 PM
views 53  views

नवी दिल्ली : तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' (IOCL) मध्ये काम करण्यास आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेण्यास इच्छुक तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड'ने 'ट्रेड अप्रेंटिस' आणि 'टेक्निशियन अप्रेंटिस' या पदांसाठी एकूण ५८ जागा भरण्याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. त्यांची निवड थेट शैक्षणिक गुणांवर आधारित गुणवत्ता यादीद्वारे (मेरिट लिस्ट) केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार १८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' अप्रेंटिसशिप भरतीसाठी पात्रता निकष संबंधित ट्रेडनुसार निश्चित करण्यात आले आहेत.

ट्रेड अप्रेंटिससाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र धारण केलेले असावे. टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेतील ३ वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वरील दोन्ही पदांसाठी वयोमर्यादेमध्ये उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल. उमेदवारांनी आयटीआय, १० वी किंवा डिप्लोमा परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ज्या उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत असतील, त्यांना थेट कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यशस्वी उमेदवारांची अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल आणि त्यांना नियमांनुसार स्टायपेंड दिले जाईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इंडियन ऑईलच्या iocl.com या अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवरील करिअर सेक्शनमध्ये जा आणि 'Apprenticeship Engagement' या लिंकवर क्लिक करा.

संबंधित अधिसूचना उघडा आणि आपली मूलभूत माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज फॉर्ममध्ये तुमची शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक माहिती आणि छायाचित्र/स्वाक्षरी काळजीपूर्वक अपलोड करा. सर्व डिटेल्स तपासल्यानंतर, फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना तपासावी. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.