
मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर रोजी रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बिग बजेट असणार आहे. बॉक्स ऑफिसवर रणबीरच्या 'रामायण' चित्रपटाला टक्कर देण्यासाठी अक्षय कुमार सज्ज झाला आहे.
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेला 'मोहरा' यामध्ये अक्षय कुमार, रवीना टंडन आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत होते. हा एक सुपरहिट चित्रपट ठरला होता. आता ३२ वर्षांनंतर हा चित्रपट ४के व्हर्जनमध्ये पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलिज होणार आहे. 'रामायण' प्रदर्शित झाल्यानंतर ६ नोव्हेंबर २०२६ रोजी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर रामाची, सई पल्लवी सीतेची, यश रावणाची, सनी देओल हनुमानाची आणि रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारत आहेत. याव्यतिरिक्त, या चित्रपटात अरुण गोविल, रकुल प्रीत सिंग, लारा दत्ता, काजल अग्रवाल आणि कुणाल कपूर यांच्यासह इतर अनेक कलाकारही आहेत.
'मोहरा' चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाची घोषणा 'त्रिमूर्ती प्रायव्हेट लिमिटेड' (Trimurti Private Limited) द्वारे करण्यात आली आहे. राजीव राय दिग्दर्शित आणि गुलशन राय निर्मित 'मोहरा' हा चित्रपट विशाल अग्निहोत्री (सुनील शेट्टी) याच्या कथेभोवती फिरतो. त्याच्या पत्नीवर बलात्कार करून तिची हत्या केली जाते. जेव्हा कायदेशीर आणि न्यायव्यवस्था न्याय देण्यात अपयशी ठरते तेव्हा तो स्वतःच गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतो. या कृत्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते.
या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि रवीना टंडन यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह, परेश रावल, गुलशन ग्रोव्हर आणि रझा मुराद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एक ब्लॉकबस्टर ठरला होता आणि त्यातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' व 'टिप टिप बरसा पानी' यांसारखी गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








