LIVE UPDATES

political news : विधान परिषद ,पदवीधर शिक्षक निकालाचे काय आहे चित्र ?

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 28, 2026 01:23 PM
views 81  views
#kokansadlive#news update#konkan update#

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी सकाळपर्यंत सुरू होती. सकाळी ७ वाजेपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, पाचपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीचे (मविआ), तर दोन जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडी घेतली आहे. सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार मविआचे २ तर महायुतीचे ३ उमेदवार आघाडीवर आहे.

पुणे पदवीधर: महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव आघाडीवर.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर: मविआचे प्रतापसिंह पाटील आघाडीवर.

नागपूर पदवीधर: मविआचे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर.

पुणे शिक्षक: भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर.

अमरावती शिक्षक: शिवसेनेचे किरण सरनाईक आघाडीवर.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना एक अजब आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर केवळ ‘२’ हा आकडा लिहिल्याने मोठ्या प्रमाणात मते अवैध ठरली आहेत. या एकाच पॅटर्नमुळे सुमारे ४ ते ५ हजार मते रद्दबातल ठरल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत एकूण १ लाख ६५ हजार ५४१ मतदान झाले होते. यापैकी तब्बल १५ हजार १०६ मते अवैध ठरली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मते अवैध होणे हे पदवीधर मतदारसंघासाठी असामान्य मानले जात आहे. विशेषतः सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर फक्त ‘२’ लिहिलेल्या मतपत्रिका मोठ्या संख्येने आढळल्यामुळे हे प्रमाण आणखी वाढले आहे. या अवैध मतांचा थेट परिणाम मतमोजणीच्या अंतिम निकालावर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असताना हा प्रकार आणखी चर्चेत आला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातही चुरस

पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर सुरू आहे. पहिल्या पसंतीच्या मतांत मविआच्या हर्षदा देशमुख आघाडीवर आहेत. दुसऱ्या स्थानी भाजपच्या स्मिता जाधव आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांत भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप आले असून रासप पुरस्कृत उमेदवार दत्ता सावंत तिसऱ्या स्थानावर आहेत. पुणे शिक्षक मतमोजणीत 1 हजार 675 मतं बाद ठरली. तर 51 हजार 511 मतं वैध ठरलीत. त्यामुळे जिंकून येणाऱ्या उमेदवाराला किमान 25 हजार 756 मतांचा कोटा निश्चित केला गेला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी 2 लाख 26 हजार 224 मते वैध ठरली आहेत. विजयासाठी 1 लाख 13113 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुक अपडेट

अमरावती शिक्षक मतदारसंघातील 18 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. चौदाव्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक 3,493 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर तर शिंदेंच्या शिवसेनेचे बंडोखर उमेदवार श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौदाव्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8,229 मतं तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4736 मतं आहेत तर शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांना 4,715 मतं आहेत. दरम्यान 26 उमेदवारांपैकी 15 उमेदवार रिंगणाच्या बाहेर आहेत.

छत्रपती संभाजीनगर निवडणुक अपडेट

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी शपचे प्रतापसिंह पाटील हे 10 हजार 934 मतांनी आघाडीवर आहेत. डॉ. प्रतापसिंह पाटील 54 हजार 095 मतांनी आघाडीवर आहे तर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण 43 हजार 161 मतांनी दुसऱ्या स्थानी आहेत.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
संत राऊळ महाराज महाविद्यालयास ‘स्वायत्त’ दर्जा जाहीर
October 28, 2026
Indian para-athlete Neeraj Yadav, three-time Asian Para Games gold medalist
Para athletics India : भारताच्या सुवर्णपदक विजेत्या पॅरा-ॲथलीटचा दुर्दैवी अंत
October 28, 2026
 Cyclone Arnab impacts Andhra Pradesh with heavy rain and strong winds
Cyclone Arnab : 'अर्णब' चक्रीवादळाचा तडाखा! २४ जिल्हे बाधित, १.३५ लाख लोकांचे स्थलांतर; १०० हून अधिक रेल्वे रद्द
October 28, 2026
Akshay Kumar and Raveena Tandon in Mohra movie re-release news
रणबीरच्या 'रामायण'समोर अक्षय कुमारचा 'मोहरा'! ३२ वर्षांनंतर चित्रपटाची 4K व्हर्जनमध्ये थिएटरमध्ये दमदार एंट्री
October 28, 2026
संबंधित बातम्या

View all

संकटग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संवेदनशील पुढाकार
October 27, 2026
Maharashtra Cabinet approves 100 percent funding support for Navi Mumbai Chipi flight service
Maharashtra Cabinet Decision : चिपी विमानसेवेला १०० टक्के निधीचे पाठबळ
October 27, 2026
Tukaram Mundhe
दिवाळीपूर्वी एफडीएची मोठी कारवाई, महाराष्ट्रात १६.९२ कोटींचा खाद्यसाठा जप्त, ६८ परवाने रद्द
October 25, 2026
EX-INS Guldar Underwater Museum and Submarine Tourism Project in Sindhudurg, Maharashtra
Sindhudurg EX-INS Guldar Project : सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर
October 25, 2026