LIVE UPDATES

वीकेंडला काय पाहायचं? Netflix आणि JioHotstar वर रिलीज होणार नवीन चित्रपट अन् वेब सीरिज

OTT Releases This Week : २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि मालिका रिलिज होणार आहेत. यामध्ये ॲक्शन थ्रिलरपासून ते विनोदी आशयापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 26, 2026 04:12 PM
views 89  views
Upcoming OTT movies and web series releases on Netflix and JioHotstar this week

नवी दिल्ली : ओटीटी प्रेमींसाठी हा आठवडा अतिशय उत्तम असणार आहे. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि मालिका रिलिज होणार आहेत. यामध्ये ॲक्शन थ्रिलरपासून ते विनोदी आशयापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. चला तर मग पाहूया, कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय रिलिज होत आहे.

ढिंडोरा (Dhindora)

ही सिरिज नेटफ्लिक्सवर (Netflix) २८ ऑक्टोबर रोजी रिलिज होणार आहे. ही सिरिज एक विनोदी आहे. २०२१ मध्ये ती सर्वप्रथम 'बीबी की वाइन्स' या यूट्यूब चॅनेलवर रिलिज झाली होती आणि आता ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

अक्का (Akka)

ही सिरिज नेटफ्लिक्सवर (Netflix) ३० ऑक्टोबर रोजी रिलिज होणार आहे. ही सिरिज क्राईम थ्रिलर आहे. याची कथा १९८० च्या दशकातील दक्षिण भारतातील 'पेर्नुरू' नावाच्या एका काल्पनिक शहरात घडते.

मीठे में क्या है (Meethe Mein Kya Hai)

हा चित्रपट नेटफ्लिक्स (Netflix)वर ३० ऑक्टोबर रोजी रिलिज होत आहे. हा राधिका बन्सल दिग्दर्शित एक कौटुंबिक ड्रामा-कॉमेडी चित्रपट आहे. यात ऋत्विक भौमिक, रोहिणी हट्टंगडी, आयेशा रझा मिश्रा, अभय कौल, तराना राजा, गौरव के. शर्मा आणि विक्रम बक्षी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

डेड एंड जॉब (Dead End Job)

ही सिरिज नेटफ्लिक्सवर (Netflix) ३० ऑक्टोबर रोजी रिलिज होणार आहे. ही 'सर्व्हायव्हल' विषयावर आधारित, कार्यस्थळावरील एक हॉरर-ड्रामा सिरिज आहे. याची कथा ब्योन ह्युक-जुन या पात्राभोवती फिरते.

ऑब्सेस

ही सिरिज ३० ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलिज होणार आहे. ही एक मध्य-पूर्वेकडील भयपट आणि मानसशास्त्रीय थरारपट मालिका आहे.

बलराव: ब्लड आयलंड

ही सिरिज २९ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलिज होत आहे. ही फिलीपिन्स येथील एक भयपट-रहस्यमय मालिका आहे.

सब-इन्स्पेक्टर युगांधर

हा चित्रपट हा राघवेंद्र कटारी दिग्दर्शित एक तेलुगू क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. एका पोलीस इन्स्पेक्टरभोवती याची कथा फिरते, ज्याला एका सीरियल किलरला पकडण्याचे काम सोपवले जाते. हा चित्रपट ३० ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे.

बार्बी इन द नटक्रॅकर

हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलिज होणार असून हा मुलांसाठीचा एक ॲनिमेटेड चित्रपट आहे. यामध्ये बार्बी आणि तिची बहीण केली आहेत. याचे आयएमडीबी रेटिंग ६.४ आहे.

लव्ह ऑलवेज 

ही सिरिज ३० ऑक्टोबर रोजी जिओ हॉटस्टारवर रिलिज होणार असून ही एक तमिळ रोमँटिक कॉमेडी-फँटसी सिरिज आहे.


ताजी बातमी

View all

महेश इंगळे यांच्या कार्याचा गौरव
October 26, 2026
भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार मैदानात, कधी अन् कुठे रंगणार सामना? वाचा सविस्तर
October 26, 2026
४५ महसूल लोक अदालतींमधून ५३ प्रकरणांचा यशस्वी निपटारा
October 26, 2026
शाळकरी मुलांनी मनसोक्त जगावे, खेळावे, वाचावे : डॉ. अक्षय फाटक
October 26, 2026
संबंधित बातम्या

View all

Memorial programme for veteran Vastraharan playwright Gangaram Gavankar in Malvan
Gangaram Gavankar : ‘वस्त्रहरण’कार कै. गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतिदिनी मालवणमध्ये नाट्यसोहळा
October 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
Salman Khan Security : सलमान खानच्या सुरक्षेत वाढ
October 21, 2026
सावंतवाडी माठेवाडा नवरात्रोत्सवात गोवन मेलडीज ऑर्केस्ट्राचा जल्लोष
October 17, 2026
कुडाळ - सांगिर्डेवाडीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
October 16, 2026