LIVE UPDATES

sawantwadi News : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा

सावंतवाडी पोलिसांची कारवाई ; ज्युपीटरसह १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 28, 2026 11:20 AM
views 288  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : शहरात बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू बाळगून ती विक्रीसाठी फिरणाऱ्या एका संशयितावर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या टीव्हीएस ज्युपीटर गाड्यांसह तब्बल १ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास सावंतवाडी शहरात ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपी श्रीकांत आजगावकर हा आपल्या ताब्यातील दोन वेगवेगळ्या टीव्हीएस ज्युपीटर गाड्यांच्या (क्र. MH-07-AV-9515 व क्र. MH-07-AW-1201) डिकीमध्ये विनापरवाना व बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूच्या सिलबंद बाटल्या विक्री करत असताना रंगेहात निदर्शनास आला.

या कारवाईदरम्यान दोन्ही ज्युपीटर गाड्या आणि त्यांच्या डिकीमध्ये आढळून आलेल्या विविध कंपन्यांच्या गोवा बनावटीच्या दारूच्या सिलबंद बाटल्या असा एकूण १ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री. हिंगे, पीएसआय अविनाश पाटील, हेड कॉन्स्टेबल श्री‌. शिंदे, अमित  राऊळ, श्री. भुजबळ आणि तपास अधिकारी श्री. शिंगाडे व इतर अंमलदारांच्या पथकाने केली आहे. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
संत राऊळ महाराज महाविद्यालयास ‘स्वायत्त’ दर्जा जाहीर
October 28, 2026
Indian para-athlete Neeraj Yadav, three-time Asian Para Games gold medalist
Para athletics India : भारताच्या सुवर्णपदक विजेत्या पॅरा-ॲथलीटचा दुर्दैवी अंत
October 28, 2026
 Cyclone Arnab impacts Andhra Pradesh with heavy rain and strong winds
Cyclone Arnab : 'अर्णब' चक्रीवादळाचा तडाखा! २४ जिल्हे बाधित, १.३५ लाख लोकांचे स्थलांतर; १०० हून अधिक रेल्वे रद्द
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
political news : विधान परिषद ,पदवीधर शिक्षक निकालाचे काय आहे चित्र ?
October 28, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
Crime News : शेडमधील दुचाकी चोरट्याने लांबवली
October 28, 2026
मिठमुंबरी बागवाडी येथील मच्छीमारांना धमकावल्याप्रकरणी कारवाईची मागणी
October 27, 2026
Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
Goa ACB raid at Mole and Patradevi excise check posts
Goa ACB Raid : गोव्यातील पत्रादेवी, मोले अबकारी चेक पोस्टवर एसीबीचे छापे
October 27, 2026