
नवी दिल्ली : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)' या पदासाठी भरती केली जाणार आहे. याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून 25 ऑक्टोंबरपासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने एकूण २० संभाव्य रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शॉर्टहँड चाचणी, टायपिंग चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२६ आहे.
इंग्रजी शॉर्टहँड स्पीडमध्ये उमेदवारांना किमान १२० शब्द प्रति मिनिट या स्पीडने इंग्रजी शॉर्टहँड लिहिणे आवश्यक आहे. तर इंग्रजी टायपिंगची स्पीड ४० शब्द प्रति मिनिटे असणार आहे.
या पदासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२६ सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा ७ डिसेंबर २०२६ रोजी, उत्तरपत्रिका ८ डिसेंबर २०२६ रोजी जाहीर होणार आहे. उमेदवार उत्तरपत्रिकेवर आक्षेप ८ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२६ या कालावधीत नोंदवू शकतात.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (बॅचलर डिग्री) असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना इंग्रजी शॉर्टहँड आणि संगणक टायपिंगमध्ये ठराविक पातळीचे कौशल्य असणे अनिवार्य आहे.
या पदासाठी उमेदवारांकडे शॉर्टहँड रायटर किंवा तत्सम स्टेनोग्राफीमध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर उमेदवारांचे वय १ ऑक्टोबर २०२६ रोजी किमान ३० वर्षे आणि कमाल ४५ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत मिळणारी सवलत जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत भरती अधिसूचनेतील नियम पहा.
अर्ज शुल्क
पदासाठी सामान्य आणि इतर अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना १५०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), माजी सैनिक आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांना ७५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज कसा करावा
उमेदवारांनी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला (https://www.sci.gov.in/) भेट द्यावी. त्यानंतर 'रिक्रूटमेंट' (Recruitment) सेक्शनमध्ये जाऊन शॉर्टहँड भरतीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करावे. अर्जामध्ये आवश्यक डिटेल्स भरावेत. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंट स्वतःकडे ठेवावी.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








