
सावंतवाडी : कोकणच्या दशावतारी लोककलेत भक्तीचा गंध आणि श्रद्धेची ताकद अनुभवायला मिळते याची प्रचिती आरोलकर दशावतार नाट्यमंडळ, आरवली यांच्या दशावतार नाट्यप्रयोगातील उत्कृष्ट झांज वादक आणि रिल स्टार संतोष गुळदुवेकर यांच्या "येडामाय " या दशावतार लंगारातुन आली. येडामायच्या चरणी नतमस्तक होत, अंतःकरणापासून तिची आळवणी करणाऱ्या या ओळी मनाला स्पर्श करून जातात. संकटं दूर व्हावीत, दारिद्र्याचं सावट हटावं आणि आयुष्यात सुख-समृद्धी यावी, या भावनेतून भक्त आपल्या देवीवर अपार श्रद्धा ठेवतो.
“कुणाचा विश्वास तुटू देत नाही,” या शब्दांतून देवीवरील अढळ विश्वास आणि भक्तीची ताकद व्यक्त होते. सुरेल गायन, प्रभावी सादरीकरण आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने हा प्रसंग अधिक रंगतदार झाला. या नाट्यप्रयोगाला हार्मोनियमवर अमोल आकेरकर, पखवाजावर सौरभ मेस्त्री, तर झांज आणि गायनाची साथ संतोष गुळदुवेकर यांनी दिली. आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ आरवली कंपनी मूळ नऊ पारंपरिक मंडळापैकी सुमारे 850 वर्ष जुने पारंपरिक दशावतार मंडळ आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








