
चित्तुर : चक्रीवादळ 'अर्णब'चा जोर आता ओसरला आहे. बुधवारी रात्री हे तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. मात्र, येत्या काही दिवसांत अनेक राज्यांवर याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी, ओडिशामधील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे दक्षिण भारतातील या राज्यात मोठे नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरात या हंगामात निर्माण झालेले हे पहिलेच चक्रीवादळ असल्याचे सांगण्यात येत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'अर्णब' चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि विजयवाडा येथून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्णब चक्रीवादळामुळे 24 जिल्हे बाधित झाले असून 1.35 लाख लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. 100 हून अधिक रेल्वे रद्द करण्यात आल्या असून 4 विमानतळांवरुन 21 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.
वादळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आंध्र प्रदेशातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस नोंदवला गेला. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजता सुरू झालेला हा पाऊस २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होता. या कालावधीत २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. ओडिशा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्येही या वादळाचे परिणाम दिसून आले.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ यानमच्या दक्षिणेस बापटला आणि विशाखापट्टणम दरम्यानच्या भागात किनारपट्टीवर धडकले. परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि झाडे किंवा विजेचे खांब यांसारख्या गोष्टींपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
#WATCH | Andhra Pradesh: Several trees uprooted amid heavy rain and gusty winds as Cyclone Arnab impacts Machilipatnam. Roads have been blocked, and waterlogging has been witnessed in several areas. https://t.co/nj0YDnaRlL
— ANI (@ANI) October 28, 2026
हवामान विभागाच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, किनारपट्टीवर धडकताना या चक्रीवादळाचा वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १३५ किमी होता. हे अर्णब चक्रीवादळ काही ठिकाणी १५० किमी प्रतितास इतकाही पोहोचला होता. किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकल्यानंतर सकाळी ८:३० वाजेपर्यंत हे वादळ 'अति तीव्र चक्रीवादळा'वरून 'तीव्र चक्रीवादळा'च्या स्वरुपात आले होतो.
वादळ किनारपट्टीवर धडकले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १३५ किमी होता, जो १५० किमी प्रतितास इतकाही वाढला होता. किनारपट्टीवर धडकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, सकाळी ८:३० वाजेपर्यंत हे वादळ 'अति तीव्र चक्रीवादळा'वरून 'तीव्र चक्रीवादळा'च्या श्रेणीत रूपांतरित झाले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








