LIVE UPDATES

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताब्याचा प्रयत्न ?

कणकवलीत बैठक घेत तीव्र निषेध
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 28, 2026 11:47 AM
views 169  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या मुंबई, परळ येथील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताबा मिळविण्याचा एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री प्रयत्न केला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञाती बांधवांनी गंभीर दखल घेत त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.

संस्थेच्या आवारात येऊन विश्वस्तांच्या कार्यालयाला व डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या मुख्याद्यापिकेच्या कार्यालयाला कुलूप घालून सीसीटीव्ही यंत्रणेचे नुकसान करत विश्वस्त, सुकाणू समितीचे नामफलक काढून टाकले. त्याऐवजी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेचे नाव लिहून त्याखाली अध्यक्ष म्हणून आ. प्रसाद लाड व सेक्रेटरी म्हणून स्वतःचे व विश्वस्त म्हणून इतर तीन जणांचे नावे असलेला फलक लावला. याबाबत समाज बांधवांनी तीव्र शब्दांत नाराजी या बैठकीत व्यक्त केली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने जिल्हा कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली आहे.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी सिंधुदुर्ग क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.यावेळी उद्योजक रामदास विखाळे, पत्रकार भगवान लोके, रविंद्र जोगल, आप्पा चव्हाण, गणेश गावकर, हनुमंत वाळके, आतिष जेठे, साईनाथ ओटवकर, स्वप्निल चिंदरकर, चंद्रकांत डामरे, उत्तम लोके, मिलिंद परब, सचिन आचरेकर, विजय चिंदरकर, अनिल नरे, गणेश नेवाळकर, चंदन गावकर ,संजय रावले, अनिल साळगावकर,सचिन लोके, शरद घाटये, आदेश ओटवकर, मिलिंद परब, कमलेश नरे, रवींद्र नरे, संजय विखाळे, अमित तोडणकर, मंगेश धोपटे, भरत चव्हाण, जयराम डामरे, सुनिल हरमलकर, रमेश चिंदरकर, लक्ष्मण मसुरकर, विजय चिंदरकर, प्रणव नरे, विजय हडकर, जयानंद फाटक,सुनील हरमलकर, गुरुदास चिंदरकर आदींसह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

 या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित राहून आपली मते व सुचना मांडल्या.सभेच्या प्रारंभी भगवान लोके यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाज बांधवांना एकत्र आणून समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजासमोरील प्रश्न जाणून  घेणे आणि ते मार्गी लावण्यासाठी आगामी काळातील प्रयत्न आवश्यक आहेत, त्यासाठी समाजाची संघटना मजबुतीने काम करण्याच्यादृष्टीने चर्चा करावी, असे सुचित केले. त्यानुसार चर्चा होऊन संघटनात्मक बांधणी करण्याचे ठरले. 

तसेच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या मुंबई, परळ येथील क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी घडलेल्या घटनेबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर चर्चा करत समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

वैयक्तिक असलेले मतभेद बाजूला ठेऊन शिक्षणमहर्षी डॉ. रामचंद्र शिरोडकर, शिक्षण तज्ञ एच.डी. गावकर, प्रि. आर.आर.लोके यांच्यासह समाजातील विविध मंडळींनी समाज संस्था उभारण्यास आपले आयुष्य खर्ची घातले व शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करून बहुजन समाजातील असंख्य विद्यार्थी घडविले आहेत.

समाज संस्थेचे स्थान अबाधित ठेवण्याचे काम आपल्या समाज बांधवांचे आहे. त्यादृष्टीने सद्य विश्वस्त, सुकाणू समितीचे पदाधिकारी म्हणून काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय एकमुखी घेण्यात आला. आगामी काळात संस्था वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो ज्ञाती बांधव ह्या लढयात सहभागी होतील. त्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज जिल्हा कार्यकारिणी जाहीर

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सिंधुदुर्ग क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रामदास विखाळे, सचिव भगवान लोके, उपाध्यक्ष रविंद्र जोगल, आप्पा चव्हाण, गणेश गावकर, सहसचिव हनुमंत वाळके, सदस्य आतिष जेठे, साईनाथ ओटवकर, स्वप्निल चिंदरकर, चंद्रकांत डामरे, उत्तम लोके, मिलिंद परब, सचिन आचरेकर, विजय चिंदरकर, अनिल नरे, गणेश नेवाळकर, चंदन गावकर आदींची कार्यकारिणीत समावेश आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
संत राऊळ महाराज महाविद्यालयास ‘स्वायत्त’ दर्जा जाहीर
October 28, 2026
Indian para-athlete Neeraj Yadav, three-time Asian Para Games gold medalist
Para athletics India : भारताच्या सुवर्णपदक विजेत्या पॅरा-ॲथलीटचा दुर्दैवी अंत
October 28, 2026
 Cyclone Arnab impacts Andhra Pradesh with heavy rain and strong winds
Cyclone Arnab : 'अर्णब' चक्रीवादळाचा तडाखा! २४ जिल्हे बाधित, १.३५ लाख लोकांचे स्थलांतर; १०० हून अधिक रेल्वे रद्द
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
political news : विधान परिषद ,पदवीधर शिक्षक निकालाचे काय आहे चित्र ?
October 28, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
संत राऊळ महाराज महाविद्यालयास ‘स्वायत्त’ दर्जा जाहीर
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
फणसगाव नारकरवाडी अंगणवाडीत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Dodamarg News : दोडामार्गात चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
वारगाव ग्रामपंचायतीतर्फे महिलांना रोजगार मार्गदर्शन
October 28, 2026