LIVE UPDATES

sindhudurg News : मागण्या मान्य न झाल्यास 'दिवाळी अंधारात' घालवणार

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा इशारा; कुडाळसह संपूर्ण राज्यात एक दिवसीय धरणे आंदोलन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 28, 2026 10:30 AM
views 124  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न: भारतीय मजदूर संघ) यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे महावितरण कंत्राटी कामगारांचे एक दिवसीय धरणे आंदोलन पार पडले. ६ नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ऐन दिवाळीत काम बंद आंदोलन करून राज्यभर 'दिवाळी अंधारात' घालवण्याचा गंभीर इशारा कंत्राटी कामगार संघटनेने दिला आहे.

हे आंदोलन केवळ सिंधुदुर्गातच नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छेडण्यात आले होते. हरियाणा सरकारच्या 'कौशल्य बोर्ड पॅटर्न'प्रमाणे महाराष्ट्रातही 'कॉन्ट्रॅक्टर-लेस' (कंत्राटदारमुक्त) प्रणाली लागू करावी, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे.

 रखडलेले किमान वेतन त्वरित लागू करणे, तसेच कामगारांना पेट्रोल, मोबाईल, धुलाई भत्ता व अपघात विमा कवच देण्याची मागणी, एकाच सब-डिव्हिजनमध्ये ३-३ कंत्राटदार नेमले जात असल्याने अधिकारी व कंत्राटदारांच्या मिलीभगतीमुळे कामगारांवर अन्याय होतो, टेंडर पद्धतीत बदल करणे, बदली धोरण रद्द करणे, स्मार्ट व इतर खासगी कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे आणि दिवाळीपूर्वी वेतनवाढ लागू करणे अशा विविध मागण्या घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले होते.

म्हणूनच या सर्व गंभीर प्रश्नांकडे राज्य सरकारने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ठेकेदारी पद्धतीमध्ये कामगारांवरती अन्याय होत असल्याचा देखील कामगार संघटनेने खुलासा केला आहे. 

कुडाळ येथील धरणे आंदोलनाला जिल्ह्यातील महावितरण कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामध्ये जिल्हाध्यक्ष संदीप पुंडलिक बांदेकर, सरचिटणीस संजय गोवेकर, कार्याध्यक्ष सचिन राघव, कोषाध्यक्ष रामचंद्र राऊळ, संघटन मंत्री सर्वेश राऊळ, तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, बापू देसाई, योगराज यादव, गणेश देऊलकर, दर्शन देसाई, अभय जोशी, बळीराम गावकर, महादेव बोभाटे, त्रिमूर्ती सडकर, तसेच तालुका पदाधिकारी बाबाजी गावडे, जितेंद्र परब, मनीष राणे, सुधीर तेली, आबा कापडोस्कर आणि सतीश जंगले यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.

आता या इशाऱ्यानंतर राज्य सरकार आणि महावितरण प्रशासन कामगारांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
संत राऊळ महाराज महाविद्यालयास ‘स्वायत्त’ दर्जा जाहीर
October 28, 2026
Indian para-athlete Neeraj Yadav, three-time Asian Para Games gold medalist
Para athletics India : भारताच्या सुवर्णपदक विजेत्या पॅरा-ॲथलीटचा दुर्दैवी अंत
October 28, 2026
 Cyclone Arnab impacts Andhra Pradesh with heavy rain and strong winds
Cyclone Arnab : 'अर्णब' चक्रीवादळाचा तडाखा! २४ जिल्हे बाधित, १.३५ लाख लोकांचे स्थलांतर; १०० हून अधिक रेल्वे रद्द
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
political news : विधान परिषद ,पदवीधर शिक्षक निकालाचे काय आहे चित्र ?
October 28, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
संत राऊळ महाराज महाविद्यालयास ‘स्वायत्त’ दर्जा जाहीर
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
फणसगाव नारकरवाडी अंगणवाडीत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
Dodamarg News : दोडामार्गात चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेवर ताब्याचा प्रयत्न ?
October 28, 2026