
देवगड : दीपावली पूर्वसंध्ये निमित्त स्वरऋतू निर्मितीतून आपल्या आवडत्या गीतांचा बहारदार संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता जामसंडे येथील सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम रंगणार आहे.
या कार्यक्रमाचे यंदा पाचवे वर्ष असून, गायिका गौतमी चिपळूणकर आपल्या सुमधुर गायनातून रसिकांना संगीताची मेजवानी देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन संजय कात्रे करणार आहेत. वादक कलाकार म्हणून प्रसाद करंबेळकर, वरद सोहनी, सौरभ वेलणकर आणि हर्षद जोशी सहभागी होणार आहेत. ध्वनिसंयोजनाची जबाबदारी एस. कुमार साऊंड यांच्याकडे आहे.
कार्यक्रमाला हॉटेल प्रपंच देवगड, अवनी डेव्हलपर्स, जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, जोग मेडिकल्स (प्रवीण जोग, जामसंडे), हॉटेल अथर्व, पाटणकर बंधू आणि श्री स्वाद यांचे सहकार्य लाभले आहे. या संगीत मैफलीचा देवगड परिसरातील संगीतप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








