LIVE UPDATES

घर तेथे शोषखड्डा अभियानाचा देवगड तालुक्यात शुभारंभ

कुणकेश्वर येथे शोषखड्डा कामाचे भूमिपूजन; पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात मोहीम राबविणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 07:23 PM
views 33  views

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत रोजगार हमी व आजीविका मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत देवगड तालुक्यात ‘घर तेथे शोषखड्डा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत कुणकेश्वर ग्रामपंचायत हद्दीत शोषखड्डा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन माजी सरपंच महेश ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील, तांत्रिक सहाय्यक सोनजी जोगळ, ग्रामरोजगार सहाय्यक मंगेश मेस्त्री आणि लाभार्थी सुभाष वाळके उपस्थित होते. शोषखड्डे व जलधारा यांसारख्या जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी भूजल पातळीत वाढ होण्यास हातभार लागून भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल.

गावाच्या विकासासोबतच नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन आणि पाणीसमस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या अभियानाला महत्त्व आहे. देवगड तालुक्यात पंचायत समितीच्या वतीने ‘घर तेथे शोषखड्डा’ ही मोहीम राबविण्यात येत असून, जलसंधारणाची कामे प्रत्येक गावात प्रभावीपणे करण्यावर भर दिला जात आहे.


ताजी बातमी

View all

Satish Pandharinath Bagal appointed as Additional Collector of Sindhudurg district by Maharashtra Government.
Sindhudurg News : अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली
October 31, 2026
माहिती न दिल्याने तत्कालीन ग्रामसेवकाला २५ हजारांचा दंड
October 31, 2026
Manisha Bhanwala Celebrates Gold Medal Victory at World Wrestling Championship
Manisha Bhanwala : जागतिक कुस्ती स्पर्धेत मनीषा भानवालाचा ऐतिहासिक पराक्रम
October 31, 2026
State Excise Department Officials Seize Goa-Made Liquor and Tempo Worth ₹55.50 Lakh at Zarap in Sindhudurg
Goa Liquor Seizure : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

Satish Pandharinath Bagal appointed as Additional Collector of Sindhudurg district by Maharashtra Government.
Sindhudurg News : अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची बदली
October 31, 2026
MP Narayan Rane Interacting with BJP Leaders and Workers at Party Office in Vengurla
Narayan Rane : खासदार नारायण राणेंनी साधला वेंगुर्ल्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद
October 31, 2026
Konkan Marathi Sahitya Sammelan 2026 : दुष्काळामुळे कोमसापचे १८ वे साहित्य संमेलन तात्पुरते पुढे ढकलले
October 31, 2026
मिठमुंबरी-बागवाडी प्रकरणी ३ नोव्हेंबरला ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा
October 31, 2026