
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप येथील ओव्हरब्रिजजवळ गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने पकडला. या कारवाईत दारूच्या ४८ हजार सीलबंद बाटल्यांसह टेम्पो असा एकूण सुमारे ५५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक आणि क्लीनरला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एलसीबीच्या कुडाळ शाखेने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर रोजी मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथील ओव्हर ब्रिज येथे पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी तपासणी दरम्यान एका अशोक लेलेंड कंपनीच्या टेम्पोमध्ये छुप्या पध्दतीने गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असताना दिसून आले. सदरचा हा दारूचा मुद्देमाल तसेच टेम्पो पुढील कारवाईसाठी जप्त करण्यात आला.
या कारवाईत १८० मि.ली. मापाच्या दारू असलेल्या ४८ हजार सिलबंद काचेच्या बाटल्या मिळून सुमारे ३८ लाख ४० हजार रुपये व टेम्पोची किंमत १७ लाख रुपये व इतर मुद्देमाल असा एकूण ५५ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुदेदमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी टेम्पोचालक संशयित प्रदिप क्षीरसागर (वय २६ वर्ष, रा. मधुकर सहादु जगळे, जाखोरी, जाखोरी ता. जि. नाशिक), क्लिनर संशयित सचिन पवार, (वय ५६ वर्ष, रा. ३६१, डिवटे गल्ली, कराड ) यांना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरु आहे.
सदर कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त स्नेहलता नरवणे व अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मिलींद गरुड, दुय्यम निरीक्षक उदय थोरात, दुय्यम निरीक्षक अर्चना वंजारी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, नंदकुमार राणे, वैभव कोळेकर, प्रसाद खटाटे, साईनाथ मेहकर जवान व जगन चव्हाण जवान, वाहनचालक यांनी सहभाग घेतलेला असून त्यामध्ये मदतनीस म्हणून विजय राऊळ, प्रशांत परब व अवधुत सावंत यांनी मदत केली. सदर गुन्हयाची कायदेशीर फिर्याद जवान नंदकुमार राणे यांनी दिलेली असून या गुन्हयाचा पुढील तपास कुडाळ दुय्यम निरीक्षक उदय थोरात हे करीत आहेत.
बॉक्स महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता असे लेबल
सदरची ही दारू गोव्यात बनली असून या दारूच्या सर्व बॉटलवर बॉक्सवर लेबल मात्र महाराष्ट्र राज्यात विक्री करता असे लावण्यात आले असून देशी दारू असल्याचे या कारवाईत स्पष्ट झाले आहे. यामध्ये सुमारे 48 हजारच्या दारूच्या बॉटल असून त्या 48 बॉक्स मध्ये एक हजार बॉटल अशा ठेवण्यात आल्या होत्या
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








