LIVE UPDATES

PM SVANidhi Scheme Sawantwadi : सावंतवाडीतील पथविक्रेत्यांना मिळणार ५० हजारांपर्यंत कर्ज

पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्याचे ॲड. अनिल निरवडेकर यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 31, 2026 12:27 PM
views 82  views
PM SVANidhi scheme for street vendors in Sawantwadi Municipal Council, offering loans up to ₹50,000.

सावंतवाडी : नगरपरिषदेच्यावतीने शहरातील सर्व पथविक्रेते आणि फेरीवाल्यांसाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी 'पीएम स्वनिधी' पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे. 

या योजनेच्या मार्गदर्शनासाठी व अर्ज प्रक्रियेसाठी नगरपरिषदेमध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पहिला टप्प्यात लाभार्थ्यांना सुरुवातीला १५ हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज एका वर्षाच्या आत नियमित भरल्यास केंद्र सरकारकडून ७ टक्के सबसिडी दिली जाते. तर पहिले कर्ज वेळेत फेडणाऱ्या लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपयांचे कर्ज मिळण्यास पात्र ठरवले जाते. दुसरे कर्ज दोन वर्षांच्या मुदतीत पूर्ण भरल्यास पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक फेरीवाल्यांनी आणि पथविक्रेत्यांनी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड सोबत आणावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे लहान व्यापाऱ्यांना आणि पथविक्रेत्यांना आर्थिक हातभार लागण्यास मदत होणार आहे. सावंतवाडी शहरातील सर्व पात्र पथविक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या कक्षाशी संपर्क साधून या योजनेचा त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Maharashtra Government Approves 49 Educational Items Kit for Construction Workers' Children
Maharashtra Education Scheme : बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार
October 31, 2026
BJP councillors meet Sawantwadi police officials over fake MNGL gas connection calls and online OTP fraud targeting residents.
MNGL Gas Fraud in Sawantwadi : सावंतवाडीत एमएनजीएलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करा
October 31, 2026
वेंगुर्ल्यात १ नोव्हेंबर रोजी महारक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन
October 31, 2026
कुडाळमध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ५ किमी ‘रन फॉर युनिटी’
October 31, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Government Approves 49 Educational Items Kit for Construction Workers' Children
Maharashtra Education Scheme : बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य संच मिळणार
October 31, 2026
BJP councillors meet Sawantwadi police officials over fake MNGL gas connection calls and online OTP fraud targeting residents.
MNGL Gas Fraud in Sawantwadi : सावंतवाडीत एमएनजीएलच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करा
October 31, 2026
Kaka Kudalkar criticizes former MLA Vaibhav Naik while defending MLA Nilesh Rane over political remarks in Sindhudurg.
वैभव नाईक यांनी जनतेचा विश्वास गमावला म्हणूनच ते माजी आमदार झाले
October 31, 2026
घुंगुरकाठीतर्फे सिंधुदुर्गवासियांचा कसालमध्ये साहित्य सोहळा
October 31, 2026