
सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर नाही तर ते हिंदुत्ववादी होते. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा हिंदूमय झाला पाहिजे यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे केले. ते स्व. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल या पुस्तक रुपी ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त बोलत होते.
शिवशंभु विचार मंच, शिवप्रेमी संघटना कोकण प्रांत सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग सह्याद्री प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान दुर्ग मावळा प्रतिष्ठान, स्वराज्य सक्षमीकरण प्रतिष्ठान, यांच्यामार्फत स्व. गजानन भास्कर मेहेंदळे लिखित औरंगजेब आणि उत्तरकालीन मुगल या पुस्तकातील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा कुडाळ येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणे तसेच राष्ट्रीय संयोजक सुधीर थोरात, भूषण साटम, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, रमा नाईक उपस्थित होते. हा प्रकाशन सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाला.
यावेळी पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येक हिंदूंनी वाचला पाहिजे. काहीजण छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते असे सांगतात. पण वस्तुस्थिती तशी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते. त्यावेळी हिंदू समाजातील लोकांवर जे मुघल अन्याय अत्याचार करत होते त्यांच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज लढत होते आणि त्यातूनच स्वराज्य निर्माण झाले.
काहीजण असेही सांगतात की, महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते. जर ते मुस्लिम विरुद्ध लढत होते तर आपल्या सैन्यात मुस्लिम का भरणा करतील याबाबतही अनेक पुस्तके आहेत. ज्यामध्ये महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते हे पुरावे मिळतात. या देशाला इस्लाम करण्यासाठी जो अजेंडा सुरू आहे त्याला आपल्याला छेद द्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदूंनी जागृत राहणे काळाची गरज आहे. औरंगजेब आणि उत्तरकालीन मुघल हे पुस्तक प्रत्येकाने वाचणे आवश्यक आहे. यामध्ये इतिहासाची पानें उलगडताना मुगल सल्तनत कशी होती हे लक्षात येईल असे त्यांनी सांगून हिंदूने एकजूट करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी महाराजांचा इतिहास वाचण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








