
देवगड : मिठमुंबरी-बागवाडी येथील जेटीवर कायाकिंग प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांना धमकावल्याचा आरोप करत संबंधित बाहेरील व्यावसायिकाविरोधात चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मिठमुंबरी येथील ग्रामस्थ व स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे. याबाबत देवगड पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कायाकिंग प्रकल्पाच्या उद्घाटनदरम्यान मच्छीमारांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणी दोन तास चर्चा करूनही बाहेरील व्यक्तींवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची भूमिका मच्छीमारांनी मांडली आहे. संबंधित व्यक्तीविरोधात दोन दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास सर्व मच्छीमार बांधवांना सोबत घेऊन जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी रमेश तारी, उमेश तारी, प्रमोद आडकर, अभय पराडकर सत्यवान नेसवणकर, नमिता तारी, किशोरी खवळे, सुकन्या मोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्नाची दखल घेऊन निवेदनातील मागण्यांवर योग्य तो विचार करून न्याय द्यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








