LIVE UPDATES

Crime News : शेडमधील दुचाकी चोरट्याने लांबवली

सावंतवाडी पोलिसात तक्रार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 28, 2026 12:52 PM
views 60  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : वेत्ये येथे महामार्गाच्या शेजारी असलेल्या एका उघड्या शेडमध्ये उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विजय विलास लांडगे (वय २८, व्यवसाय - कॉन्ट्रॅक्टर, मूळ रा. मनेराजुरी, जि. सांगली, सध्या रा. निरवडे, ता. सावंतवाडी) यांनी आपली लाल-काळ्या रंगाची हिरो कंपनीची 'एचएफ डिलक्स' (क्रमांक MH 10 DE 6866) मोटारसायकल वेत्ये येथील हायवे शेजारील जितेंद्र गावकर यांच्या उघड्या शेडमध्ये उभी करून ठेवली होती. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधत ही मोटारसायकल लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.

याप्रकरणी विजय लांडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील आणि पोलीस हवालदार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार धोत्रे करत असून दाखल अंमलदार म्हणून महिला पोलीस हवालदार कदम यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#
संत राऊळ महाराज महाविद्यालयास ‘स्वायत्त’ दर्जा जाहीर
October 28, 2026
Indian para-athlete Neeraj Yadav, three-time Asian Para Games gold medalist
Para athletics India : भारताच्या सुवर्णपदक विजेत्या पॅरा-ॲथलीटचा दुर्दैवी अंत
October 28, 2026
 Cyclone Arnab impacts Andhra Pradesh with heavy rain and strong winds
Cyclone Arnab : 'अर्णब' चक्रीवादळाचा तडाखा! २४ जिल्हे बाधित, १.३५ लाख लोकांचे स्थलांतर; १०० हून अधिक रेल्वे रद्द
October 28, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
political news : विधान परिषद ,पदवीधर शिक्षक निकालाचे काय आहे चित्र ?
October 28, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update#
sawantwadi News : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा
October 28, 2026
मिठमुंबरी बागवाडी येथील मच्छीमारांना धमकावल्याप्रकरणी कारवाईची मागणी
October 27, 2026
Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case
Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात
October 27, 2026
Goa ACB raid at Mole and Patradevi excise check posts
Goa ACB Raid : गोव्यातील पत्रादेवी, मोले अबकारी चेक पोस्टवर एसीबीचे छापे
October 27, 2026