LIVE UPDATES

Kudal Crime News : कुडाळमधील गुन्ह्यातील फरार संशयिताला पुण्यातून घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई : कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 27, 2026 04:13 PM
views 133  views
Sindhudurg Local Crime Branch arrests absconding suspect in Pune in Kudal crime case

कुडाळ : अपहरण आणि धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित विलास संभाजी वसेकर (वय ३५, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले. ही कारवाई २६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून विलास वसेकर हा स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत असल्याने त्याचा शोध सुरू होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याचा सातत्याने शोध घेतला.

दरम्यान, तो पुण्यातील मोशी येथील कचरा डेपो परिसरात अँथनी लारा रिन्यूएबल एनर्जी या कंपनीत काम करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. तसेच त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून शोध घेतला असता तो मोशी, पुणे येथे आढळून आला. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले.

गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर २७ ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कुडाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

वसेकरविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास वसेकर याच्याविरुद्ध सोलापूर ग्रामीणमधील बार्शी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४-ब, ३५४-अ यांसारख्या कलमांनुसार एकूण तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, सदानंद राणे, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि प्रथमेश कदम (मोपवि) यांचा समावेश होता.


ताजी बातमी

View all

Maharashtra Cabinet approves 100 percent funding support for Navi Mumbai Chipi flight service
Maharashtra Cabinet Decision : चिपी विमानसेवेला १०० टक्के निधीचे पाठबळ
October 27, 2026
Maharashtra government decision on supernumerary posts for 14,747 eligible NHM contractual health workers
राज्यातील १४ हजार ७४७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
October 27, 2026
सिंधुदुर्ग जिल्हा संस्था संगणकीकरणात राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर : भवानी शंकर
October 27, 2026
सावंतवाडी नगरपालिकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी काँग्रेस करणार
October 27, 2026
संबंधित बातम्या

View all

Goa ACB raid at Mole and Patradevi excise check posts
Goa ACB Raid : गोव्यातील पत्रादेवी, मोले अबकारी चेक पोस्टवर एसीबीचे छापे
October 27, 2026
Bagwadi Jetty at Mithmumbari in Devgad, where a dispute over the KayGo Kayaking water sports business led to a police case.
Bagwadi Jetty Kayaking Case : मिठमुंबरीत ‘कायगो कायाकिंग’च्या शुभारंभाला विरोध
October 26, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#goa news
Accident news | पणजीतील मांडवी पूलावर काळाचा घाला
October 26, 2026
सातार्ड्यात मायलेकाने एकमेकांचे हात बांधून तेरेखोल नदीत संपविले जीवन
October 25, 2026