
सावंतवाडी : देशभरात 26 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 'दक्षता जागरूकता सप्ताह २०२६' साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यातील पत्रादेवी आणि मोले येथील अबकारी खात्याच्या चेक पोस्टवर भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाने (ACB) अचानक छापे टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम जप्त करण्यात आली असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोले येथील अबकारी चेक पोस्टवर निरीक्षक सतीश गावडे यांनी, तर पत्रादेवी येथील अबकारी चेक पोस्टवर निरीक्षक प्रज्योत फडते यांनी आपल्या पथकासह एसीबीचे अधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
या अचानक केलेल्या तपासणीमध्ये मोले अबकारी चेक पोस्टवर १०,५७० रुपये, तर पत्रादेवी नाक्यावर २,५०० रुपये रोख रक्कम अशी दोन्ही चेक पोस्टवर एकूण १३ हजार ७० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. घटनास्थळी उपस्थित संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून एसीबीकडून चौकशी सुरू आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








