1 लाखाच्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेच नगराध्यक्ष संदेश पारकरांच्या हस्ते उद्घाटन

उद्योजक संदीप चौकेकर आणि प्रवीण तांबे मित्रमंडळ शिरवलचं आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 15, 2026 13:18 PM
views 278  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिरवल गावांमधील संदीप चौककर मित्रमंडळ व प्रवीण तांबे मित्रमंडळ, शिरवल आयोजित एक गाव एक संघ भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिरवल सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रवीण तांबे उपस्थित होते.

भव्य अशा पाच दिवस चालणाऱ्या ओव्हर क्रिकेट स्पर्धेत साठी प्रथम पारितोषिक १,०००००/-₹ आकर्षक चषक द्वितीय ५१,०००/-₹ आकर्षक चषक , तृतीय १५,००० /-₹ आकर्षक चषक उत्कृष्ट फलदाज २,५०० आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज २,५०० आकर्षक चषक १५,००० /-₹ आकर्षक चषक मालिकावीर आकर्षक चषक ५,००० उत्कृष्ट क्षेत्ररक्षक २,५०० आकर्षक चषक देखील असणार आहे.

नगराध्यक्ष पारकर यांनी संदीप चौकेकर आणि प्रवीण तांबे मित्र मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की भविष्यात या मित्रमंडळाने आपली उत्तरोत्तर प्रगती करावी आणि पुढच्या क्रिकेट स्पर्धा या प्रकाश झोतात खेळवाव्यात आम्ही कणकवलीत देखील बाजारपेठ मित्र मंडळाच्या माध्यमातून अशाच मोठ्या स्पर्धा घेतल्या त्यावेळी हजाराच्या संख्येने क्रिकेट प्रेमीचा जनसमुदाय उपस्थित असायचे तशाच पद्धतीने या स्पर्धा भविष्यात व्हाव्यात असे सांगत या क्रिकेट स्पर्धेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पारकर यांनी दिल्या.

यावेळी डॉ. दिलीप घाडी, बबली राणे, व्हाईस चेअरमन बभाई कोदे, पत्रकार तुळशीदास कुडतरकर, माजी सरपंच मनोज राणे, ग्रामपंचायत सदस्य सुचित गुरव, दत्ताराम तांबे, मंदार तांबे, 'गुरुप्रसाद वंजारे, सुनिल तांबे, अनिल कुडतरकर उपस्थित होते.