
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यात शिवसेना नंबर वन व अधिक भक्कम करण्यासाठी सज्ज व्हा. आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची वाटचाल उत्तम आहे. युवासेना सुद्धा वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी रेडी जि.प. मतदार संघात केले. यावेळी वेंगुर्ला तालुका शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.
"गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक" या वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या अभियानाचा आज शुभारंभ रेडी येथील श्री गणपती मंदिरात श्रीफळ ठेऊन करण्यात आला. यावेळी रेडी येथे शिवसेना शाखेची स्थापना व शाखेचे भूमिपूजन करण्यात आले. तर शिरोडा व आरवली येथे नूतन शाखांचे उदघाटन जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या हस्ते तर जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, पं स उपसभापती सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख बाळा दळवी, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सिद्धेश उर्फ भाई परब, शहरप्रमुख अजित राऊळ, पं स सदस्य योगिता परब, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, मच्छिमार नेते काशिनाथ नार्वेकर, उपतालुकाप्रमुख कौशिक परब, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, सावंतवाडी युवासेना प्रमुख क्लेटस फर्नांडिस, शहरप्रमुख सागर गावडे, शिरोडा ग्रा प सदस्य पांडुरंग नाईक, प्रथमेश बांदेकर, शितल साळगावकर, हर्षा परब, शिरोडा माजी उपसरपंच रवी पेडणेकर, माजी सदस्य प्राची नाईक, शहर सचिव उमेश आरोलकर, तालुका संघटक विशाल राऊत, सोशल मीडियाप्रमुख स्वप्नील होसमानी, शहर उपसंघटक प्रथमेश पालयेकर, शाखाप्रमुख प्रज्वल पालव, बापल सावंत, सत्यवान साटेलकर, तालुका सचिव संजय गावडे, आनंद गोडकर, रश्मी पेडणेकर, उपविभागप्रमुख कृष्णा कुडव, मयूर आरोलकर, उत्तम चव्हाण, शाखा प्रमुख कृष्णा सावंत, सुनील सादजी, सचिन कृष्णाजी यांच्यासहित शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी सचिन वालावलकर म्हणाले, गावागावात पक्ष वाढला पाहिजे यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागा. रेडी जि प मतदार संघात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहेत. यासाठी युवासेनेचे स्थानिक युवकांना रोजगार कसा मिळेल यासाठी काम करावे असे आवाहन केले. तर उपसभापती सचिन देसाई यांनी तालुक्यात शिवसेना भक्कम होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असताना तालुक्यात शिवसैनिकांची मजबूत फळी निर्माण करण्याचे आवाहन केले. तर तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी ही सुरुवात असून संपूर्ण तालुका भगवामय करण्याच्या दृष्टीने काम करूया असे आवाहन केले.
यावेळी रेडी शाखाप्रमुख पदी कृष्णा सातजी, शिरोडा शाखाप्रमुखपदी उपसरपंच चंदन हाडकी, रेडी उपशाखाप्रमुखपदी संतोष गवंडी, युवासेना शाखाप्रमुख पदी जयेश राणे तर आरवली शाखाप्रमुख पदी कृष्णा सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.











