LIVE UPDATES

शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी

१९३ पैकी १७२ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी; २१ उमेदवार गैरहजर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 03, 2026 20:29 PM
views 99  views

सिंधुदुर्गनगरी : पवित्र पोर्टलअंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीसाठी गुरुवारी (३ सप्टेंबर) जिल्हा परिषद आवारात उमेदवारांची गर्दी झाली होती. निवड यादीतील १९३ उमेदवारांना पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी १७२ उमेदवार उपस्थित, तर २१ उमेदवार गैरहजर राहिले.

उर्दू माध्यमाच्या पाच उमेदवारांपैकी तीन उपस्थित, तर दोन गैरहजर राहिले. मराठी माध्यमाच्या १८८ उमेदवारांपैकी १६९ उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करून घेतली, तर १९ उमेदवार अनुपस्थित राहिले.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात ही पडताळणी प्रक्रिया पार पडली. उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह स्वसाक्षांकित छायांकित प्रतींचा संच आणि चार पासपोर्ट आकाराचे फोटो सादर केले. पुढील समुपदेशनाची तारीख उमेदवारांना कळविण्यात येणार आहे.