LIVE UPDATES

कोलकात्यात 3 ऑक्टोंबरला रंगणार भारत-ब्राझील फुटबॉल सामना

Edited by: Rajat Sawant
Published on: August 26, 2026 17:46 PM
views 31  views

मुंबई : भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी बहुप्रतीक्षित भारत आणि ब्राझील यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सामन्याच्या तिकिटांची विक्री डिस्ट्रिक्ट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर करण्यात येणार आहे.

भारत आणि ब्राझील यांच्यातील हा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कोलकाता येथील प्रसिद्ध सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे देशभरातील फुटबॉलप्रमींचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाला जागतिक फुटबॉलमधील बलाढ्य ब्राझीलविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार असल्याने सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ब्राझीलच्या स्टार खळाडूंचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार असल्याने तिकिटांना मोठी मागणी अपक्षित आहे. सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांना डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून बुकिंग करता येणार आहे. भारत-ब्राझील सामना पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांतून फुटबॉलप्रेमी कोलकात्यात दाखल होण्याची शक्यता आहे.