LIVE UPDATES

सावंतवाडीत १ लाखांची 'एकता दहीहंडी'

मुजिब शेख मित्रमंडळाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 03, 2026 21:07 PM
views 196  views

सावंतवाडी : मुजिब शेख मित्रमंडळ सावंतवाडीकडून भव्य 'एकता दहीहंडी' उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तब्बल १ लाखांची दहीहंडी उभारण्यात येणार आहे. यावेळी रिलस्टार कर्ली मेस संजना रावले हीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ही दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला तब्बल 1 लाखाच बक्षीस मिळणार आहे. 6 थरापेक्षा वर लावणाऱ्या गोविंदांना 2 हजारांचे बक्षिस मिळणार आहे‌. राजापूर येथील महिला गोविंदा पथक देखील यावेळी उपस्थित राहणार आहे‌.तर एम.जे. डान्स ॲकॅडमीचे नृत्याविष्कार, सिंगींग आणि इतर करमणुकीचे कार्यक्रम होणार आहे. खास आकर्षण सेल्फी पॉईंट ठरणार असून सामाजिक संदेश देणारा देखावा देखील उभारण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.