LIVE UPDATES

श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 'या' भारतीय फलंदाजाचे शानदार शतक

Dhruv Jurel second Test century : गॅले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलने अर्धशतक झळकावले होते. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून ते अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 24, 2026 18:22 PM
views 111  views

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज ध्रुव जुरेलने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करीत अर्धशतकाचे शतकात रूपांतर केले आहे. कोलंबोमधील एसएससी मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ध्रुव जुरेलने ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

गॅले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलने अर्धशतक झळकावले होते. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक असून ते अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. विशेष म्हणजे, तो केवळ आपला १२ वा कसोटी सामना खेळत आहे. या मालिकेपूर्वी जुरेलबाबत बरीच चर्चा झाली होती. परंतु दोन्ही सामन्यांत सातत्याने धावा करून त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. 

ध्रुव जुरेलने १७१ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केले. जे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने आपल्या सहाव्या कसोटी सामन्यात शतक झळकावले होते आणि आता १२ व्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा ही कामगिरी करून दाखवली आहे.

याआधी एकदा तो ९० च्या घरात बाद झाला होता, तर एका प्रसंगी त्याने अर्धशतक (५१ धावा) केले होते. जरी त्याच्या आतापर्यंतच्या अनेक खेळी लहान राहिल्या असल्या, तरी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, ज्या क्रमांकावर तो फलंदाजी करतो, त्या स्थानावरून मोठ्या धावसंख्येची नोंद होण्याचे प्रमाण तसे कमीच असते.