
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १३ सप्टेंबरपासून या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवली जाईल. १५ खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंचाच या टी-२० मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, काही खेळाडूंची निवड ही त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यानेही संघात स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी या चार खेळाडूंची निवड ही फिटनेस चाचण्या उत्तीर्ण होण्याच्या अटीवर करण्यात आली आहे.
'या' दिवशी खेळवले जाणार सामने
अफगाणिस्तान संघाविरुद्धचा पहिला सामना १३ सप्टेंबरला, दुसरा १५ सप्टेंबरला आणि अंतिम सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील.
India’s squad for Afghanistan T20I series announced. #TeamIndia will play three T20Is against Afghanistan at New Delhi, beginning September 13.#AFGvIND pic.twitter.com/UqTUeZyHz8
— BCCI (@BCCI) September 1, 2026
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
भारताविरुद्ध अफगाणिस्तानचा संघ
इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, नांग्याल खरोटी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, अब्दुल्ला अहमदजई, नवीन-उल-हक














